‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स

‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी केली आहे. ‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’ अशी खिल्ली उडवणारे पोस्टर्स मनसेने लावले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या पोस्टरचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. एकीकडे शिवसैनिक मोठ्या उत्साहात अयोध्येत पोहोचले असताना, दुसरीकडे मनसेने मुंबईत अशी पोस्टरबाजी करुन, शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो, असं शिवसेना नेते नेहमी म्हणत असतात. त्या पार्श्वभूमीवर मनसेने पोस्टरद्वारे टोलेबाजी केली.  यापूर्वीही मनसेने अनेकवेळा शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी केली होती. त्याला शिवसेनेनेही पोस्टरद्वारे उत्तर दिलं होतं.

“अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा, पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा” असे पोस्टर्सही मनसेने यापूर्वी लावले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रातून राजकीय फटाकेबाजी करत आहे, तर कार्यकर्ते पोस्टरबाजीतून टीका करत आहेत. आता यावर शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  दसरा मेळाव्यात ‘चलो अयोध्या’चा नारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्येत पोहोचतील. सध्या अयोध्येत मोठ्या प्रमाणात पोलीस बंधेबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

अयोध्या LIVE: उद्धव ठाकरे सहकुटुंब जाणार, राम मंदिरासाठी चांदीची वीट देणार   

व्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार  

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI