AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena VS MNS : ‘भगवा नाक पुसायला ठेवलाय का?’, संजय राऊतांचा व्हिडिओ ट्विट करत मनसेचा सवाल

वाट चुकलेले मुन्नाभाई अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेनेही शिवसेनेला लक्ष्य केले आहे. कालच्या सभेतील संजय राऊतांचा व्हिडीओ शेअर करत, भगवा हा नाक पुसायला ठेवलाय का, असा सवाल गजानन काळेंनी विचारला आहे.

Shivsena VS MNS : 'भगवा नाक पुसायला ठेवलाय का?', संजय राऊतांचा व्हिडिओ ट्विट करत मनसेचा सवाल
MNS on Raut
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 3:09 PM
Share

मुंबई – शिवसेनेच्या (Shivsena)शनिवारी झालेल्या सभेतील संजय राऊतांचा (Sanjay Raut)एक व्हिडीओ शेअर करत, भगवा नाक पुसायला ठेवला आहे का, असा सवाल मनसेचे (MNS)प्रवक्ते गजानन काळे यांनी विचारला आहे. मुंबईत बीकेसीत शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या विराट सभेनंतर शिवसेनेला भाजपा आणि मनसे नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येते आहे. शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे, किरिट सोमय्या यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेचं नाव न घेता, त्यांच्यावर वाट चुकलेले मुन्नाभाई अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेनेही शिवसेनेला लक्ष्य केले आहे. कालच्या सभेतील संजय राऊतांचा व्हिडीओ शेअर करत, भगवा हा नाक पुसायला ठेवलाय का, असा सवाल गजानन काळेंनी विचारला आहे.

काय आहे व्हिडीओत

मनसे नेते गजानन काळे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत शिवसेना खासदार संजय राऊत दिसतायेत. संजय राऊत यांना शिंक आल्यानंतर, ते गळ्याभोवती असलेल्या भगव्या उपरण्याने आपले नाक पुसताना दिसतायेत. या व्हिडिओवर मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली आहे, भगवा हा नाक पुसाय़ला ठेवला आहे का, असा प्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे.

उद्धव ठाकरेंनी काय केली होती टीका

शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची तुलना, नाव न घेता सिनेमातील मुन्नाभाईशी केली होती. मुन्नाभाई प्रमाणे काही जणांना स्वताला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते, शाल घेऊन फिरतात म्हणे ते हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. चित्रपटाच्या शेवटी मुन्नाभाईला कळतं की आपल्या भेज्यात केमिकल लोचा झाला आहे. तरही केमिकल लोचाची केस आहे, असे अनेक मुन्नाभाई फिरतायेत तर फिरु द्या, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

मुख्यमंत्र्यांना मनसे पाठवणार लगे रहो मुन्नाभाईची डीव्हीडी

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुखांना लगे रहो मुन्नाभाईंची डीव्हीडी पाठवणार असल्याची माहिती मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचारभूमिका आत्मसात करण्याची उद्धव ठाकरेंना गरज असल्याची टीकाही खोपकरांनी केली आहे. लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात महात्मा गांधीचे विचार वाचून चित्रपटाचा नायक त्यांना आत्मसात करतो, त्याचप्रमाणे राज ठाकरे हे सुद्धा त्यांच्या बालपणापासून बाळासाहेब ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांनी त्यांचे विचारभूमिका आत्मसात केल्या. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने आत्मसात करण्याची उद्धव ठाकरेंना गरज आहे, असा दावा खोपकरांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपट बहुदा समजलेला नाही, त्यामुळे त्यांनी तो नीट समजून घ्यावा यासाठी आम्ही मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने चित्रपटाची डीव्हीडी पाठवत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.