बाहेरील प्रेत चैत्यभूमी स्मशानात नको, मनसेचा आंदोलनाचा इशारा

कोरोनाबाधित रुग्णांच्या अंत्यविधीदरम्यान होणाऱ्या धुरामुळे शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावं लागत (MNS agitation On Shivaji Park Crematorium) आहे.

बाहेरील प्रेत चैत्यभूमी स्मशानात नको, मनसेचा आंदोलनाचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 22, 2020 | 5:33 PM

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या अंत्यविधीदरम्यान होणाऱ्या धुरामुळे शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या वतीने दादरच्या चैत्यभूमीबाहेर परिसरात आंदोलन करण्यात आलं. “जर यापुढे बाहेरील प्रेत चैत्यभूमी स्मशानभूमीत जाळण्यात आले, तर मनसे स्टाईलने खळ्ळ खट्याक आंदोलन करु,” असा धमकीवजा इशारा मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी महापालिकेला दिला आहे. (MNS agitation On Shivaji Park Crematorium)

एकीकडे कोरोनाचं गांभीर्य तर दुसरीकडे कोरोना रुग्णांचा अंत्यविधी करताना होणारा धूर याचा स्थानिक रहिवाश्यांना त्रास होत आहे. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत दादर आणि परिसराव्यतिरिक्त इतर रुग्णांचा अंत्यविधी करण्यात येतो. त्याचा रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

या स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा लागलेल्या असतात. याबाबतही अनेक तक्रारी स्थानकिांकडून प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आज मनसेने स्थानिकांसोबत आंदोलन केलं. यावेळी हातात काळे फलक घेऊन आंदोलन केलं.

या आंदोलनादरम्यान मनसे नेता यशवंत किल्लेदार यांनी महानगरपालिकेला धमकीवजा सल्ला दिला. “जर यापुढे चैत्यभूमी परिसरातील स्मशानभूमी परिसरात बाहेरील प्रेत जाळलं तर मनसे स्टाईलने खळ्ळखट्टयाक आंदोलन करु,” असे यशवंत किल्लेदार म्हणाले.

या आंदोलनादरम्यान स्थानिकांकडून महानगरपालिकेवर गंभीर आरोप करण्यात आले. या स्माशनभूमीत सतत प्रेत जाळण्यात येतात. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. तसेच या स्माशनभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा लागलेल्या असतात. याबाबतही प्रशासनाला वारंवार सांगितले आहे, मात्र यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनचा पावित्रा घ्यावा लागला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (MNS agitation On Shivaji Park Crematorium)

संबंधित बातम्या : 

Mission Zero | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा नवा अ‍ॅक्शन प्लॅन, मिशन झिरो मोहिम नेमकी काय?

ऑक्सिजनअभावी नातेवाईकाला गमावलं, मित्राकडून गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलेंडर, कारही विकली

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.