AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : या तारखा आजच नोट करा; राज्यात अतिवृष्टी, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आता या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा पाऊस अंदाज समोर आला आहे.

Monsoon Update : या तारखा आजच नोट करा; राज्यात अतिवृष्टी, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
राज्यात अतिवृष्टीचा इशारा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 02, 2026 | 9:26 PM
Share

महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना नवा हवामान अंदाज देखील समोर आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा 

‘आठ जूनपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील ज्या भागात पुरेसा पाऊस पडलेला नाही, पावसापासून वंचित आहे, त्या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नंदूरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जळगाव, बुलढाणा, अमरावती, जालना या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तर उर्वरीत जे जिल्हे आहेत, सातारा जिल्हा,सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव, जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिगोंली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, त्यानंतर वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

दरम्यान एकीकडे यंदा पावसावर अल् निनोचं सावट असल्यामुळे पाऊस कमी होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, तर दुसरीकडे मात्र राज्यात परतीचा पाऊस जोरात होईल, त्यामुळे दोन्ही खरीप आणि रब्बी हंगाम चांगले येतील, शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही, असा दावा पंजाबराव डख यांनी केला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?