मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण, तणाव दूर करण्याची मागणी

मोटरमनच्या अपघाती मृत्यूने शनिवारी मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम झाला. अनेक प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. 147 हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. आता या घटनेने मोटरमनची ताण-तणावाची नोकरी आणि त्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण, तणाव दूर करण्याची मागणी
Muralidhar SharmaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:19 PM

मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या अपघाती मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोटरमन शर्मा यांच्याकडून शुक्रवारी सकाळी पनवेल लोकलवर ड्यूटीवर असताना कुर्लानजिक लाल सिग्नल चुकीने ओलांडला गेला. त्यानंतर त्यांनी सीएसएमटीपर्यंत लोकल व्यवस्थित आणली. आणि ते सायंकाळी साडे चारच्या सुमारास भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयात तब्येत खराब झाल्याने जात असताना त्यांना प्रगती एक्सप्रेसने उडविल्याचे म्हटले जाते. मोटरमनना जादा काम दिल्याचा दावा केला जात आहे. त्यावरुन मोटरमनच्या संघटनानी शनिवारी नियमानूसार काम आंदोलन केले. त्याच्या फटका रेल्वे सेवा विस्कळीत होण्यात झाला. शर्मा यांना दोन लहान मुले असल्याने आणि ते कुटुंबाचे एकटे कमावती व्यक्ती असल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. मुंबई उपनगरातील मोटरमनना ताण-तणावाखाली काम करावे लागत असल्याने त्यांच्यासाठी मानस उपचार तज्ज्ञांची नियुक्ती करावी अशी मागणी संघटनांनी केली आहे.

मुरलीधर शर्मा ( 54 ) भायखळा – सॅंडहर्स्ट रोड येथे शुक्रवारी सायंकाळी रुळ ओलांडत असताना त्यांना प्रगती एक्सप्रेसची जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी शुक्रवारी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मोटरमन शर्मा पनवेल-सीएसएमटी लोकलवर ड्यूटी करीत होते. त्यावेळी कुर्ला जवळ त्यांच्याकडून लाल सिग्नल ओलांडला गेला. त्यांनी सीएसएमटीला लोकल व्यवस्थित आणली. त्यानंतर सायंकाळी ते भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात जात असताना रुळ ओलांडताना त्यांना प्रगती एक्सप्रेसची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कायम तणावाखाली असतात

या प्रकरणाचा तपास सीएसएमटी लोहमार्ग पोलीस सर्व दिशेने सुरु असल्याची प्रतिक्रीया मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मिड-डे या दैनिकाला दिली आहे. रेल्वेकडे मोटरमनची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन मोटरमनना ओव्हरटाईम करायला सांगते. त्यामुळे मोटरमन कायम तणावाखाली असतात. त्यामुळेच मोटरमन कडून मानवी चूका होऊ शकतात असे म्हटले जाते. त्यात त्यांच्यावर कठोर कारवाईचे दडपण असते. शर्मा यांनी रेड सिग्नल चुकीने ओलांडल्याने ते तणावाखाली होते. त्यातून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शनिवारी मोटरमननी नियमानूसार काम आंदोलन केल्याने अनेक लोकल मोटरमन अभावी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सायंकाळी घरी जाताना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. रेल्वे प्रशासनाने मोटरमनच्या अंत्यविधी करता सर्व मोटरमन कल्याण येथे गेले होते. अंत्यविधी उशीरा सुरु झाल्याने ते कामावर येऊ शकले नाहीत, असे म्हटले जात आहे.

कुटुंब पडले उघड्यावर

उत्तर प्रदेशातील आगराचे रहिवासी असलेले मुरलीधर शर्मा साल 2002 साली रेल्वेत भरती झाले. ते नोव्हेंबर 2022 मध्ये मोटरमन म्हणून बढती होऊन काम करु लागले. ते कुटुंबियांसह कल्याण येथे रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी सपना दोन मुले एक 12 वर्षांची मुलगी आणि एक दहा वर्षांचा मुलगा आहे. ते कुटुंबांचे एकमेव कमावते व्यक्ती असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने मोटरमनच्या अतिरिक्त ड्यूटी आणि नोकरीतील ताणतणावावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मोटरमनचे काम हे जोखमीचे असून तसेच त्यांच्यावर हजारो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याने रेड सिग्नल पासिंग सारखी एक चुक झाली तरी मोठी शिक्षा होते. त्यामुळे अशा कारवाईत मोटरमनची देखील बाजू ऐकली जावी असे रेल्वे कर्मचारी संघटनाचे म्हणणे आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.