महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची मोठी कामगिरी, लडाखमधील इतक्या मीटर उंच शिखरावर फडकवला तिरंगा

लडाखमधील माउंट युटी कांगरी हे ६ हजार ७० मीटर उंच शिखर. हे उंच शिखर सर करत भारताचा ७६ वा स्वतंत्रता दिवस महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी साजरा केला.

महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची मोठी कामगिरी, लडाखमधील इतक्या मीटर उंच शिखरावर फडकवला तिरंगा
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 4:35 PM

मुंबई : माउंट उटी कांगरी हे भारतातील लडाख येथील गिर्यारोहणाचे ठिकाण. या ठिकाणी शिखर ६ हजार ७० मीटर (१९,९१५ फूट) उंच आहे. त्यामुळे या उंचीवर जाण्याचे धाडस सहसा कुणी करत नाही. उटी कांगरी येथे चढण्याच धाडस केल्यास तिथं जाण्याचा अनुभव, शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या कणखर असावे लागते. मध्यम तसेच कठीण श्रेणीत गणला जाणारा माउंट उटी कांगरी गिर्यारोहकांचा चांगलाच कस काढतो. ७० अंशाच्या कोनात हे शिखर आहे. अंगावर येणारी चढाई चढताना आईस एक्स आणि क्रंपोन अश्या उपकरणाचा येथे चढण्यासाठी आधार घ्यावा लागतो. लडाखमधील माउंट युटी कांगरी हे ६ हजार ७० मीटर उंच शिखर. हे उंच शिखर सर करत भारताचा ७६ वा स्वतंत्रता दिवस महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी साजरा केला. या गिर्यारोहकांच्या टीममध्ये सोलापूरमधील गिर्यारोहक बालकृष्ण जाधव, नीलेश माने (कल्याण) आणि मुंबईतील गिर्यारोहक वैभव ऐवळे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राची टीम ९ ऑगस्ट रोजी मुंबईहून या उंच शिखरावर चढण्यासाठी गेली. दोन दिवस लेहमध्ये वातावरणाशी जुळवून घेतले. ११ ऑगस्ट रोजी जवळपास ९० किलोमीटरचा प्रवास केला. टीमने रूमतसे गावातून ट्रेकला सुरुवात केली. हे गाव जवळपास ४३०० मीटर उंचीवर आहे. महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या टीमने २ तासाचा ट्रेक करत ४ हजार ८०० मीटर उंची गाठली. बेस कॅम्पला रात्रीचा मुक्काम ठोकला.

माउंट उटी कांगरी येथे ० ते १ डिग्री तापमान असते. अशावेळी रात्र काढणे कठीण काम आहे. परंतु, गेल्या वेळचा अनुभव असल्याने टीमने तशी शारीरिक आणि मानसिक तयारी केली होती. या जोरावर त्यांनी ही मोहीम फत्ते केली.

असा होता मनमोहक परिसर

दुसऱ्या दिवशी टीमने बेस कॅम्प ते कॅम्प ५ हजार ३५० मीटर उंचीवर नेला. ५-६ तासांच्या प्रवासानंतर निसर्गाचं मनमोहक दर्शन झालं. थोडा बर्फात लपलेला उटी कांगरी दिसला. डाव्या बाजूला नदी वाहत होती. परिसरात हिरवीगार गवत होते. चहूबाजूंनी पर्वतरांग पसरलेली होती. मनमोहक दृश्य बघताना पाठीवरचे वजन जाणवतं नव्हते. साधारणतः हाय अल्टिट्युडवर ऑक्सिजनची कमतरता असते. उणे तापमान, वेगाने वाहणारे वारे, स्नो फॉल, मोरेन्स अशी अनेक आव्हानं गिर्यारोहकांच्या टीमसमोर होती.

नीलेश, वैभवची यापूर्वीची कामगिरी

नीलेश माने आणि वैभव एवळे यांनी आफ्रिका आणि युरोप खंडातील सर्वोच्च शिखरे माउंट किलीमांजारो (५ हजार ८९५ मीटर उंच) आणि माउंट एलब्रूस (५ हजार ६४२ मीटर ) सर केले. त्यांनी अनुक्रमे भारतीय तिरंगा ध्वज फडकावत ७२ आणि ७३ वा स्वतंत्रता दिवस साजरा केला. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.