आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचं आव्हान, 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करा, खासदार राहुल शेवाळेंची मागणी

धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे (MP Rahul Shewale letter to central health minister Harsh Vardhan for vaccination in dharavi).

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचं आव्हान, 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करा, खासदार राहुल शेवाळेंची मागणी
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 5:32 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज प्रचंड प्रमाणात वाढत आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा हाहा:कार उडालेला बघायला मिळतोय. मुंबईत दररोज हजारो रुग्ण आढळत आहेत. मुंबईतील सर्वात दाट वस्ती आणि आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग वाढला तर आणखी भयानक परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे या धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे (MP Rahul Shewale letter to central health minister Harsh Vardhan for vaccination in dharavi).

राहुल शेवाळे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

“गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, नागरिकांची स्वयंशिस्त, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी कोरोनावर मात करून एक अनोखं सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवलं होतं. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय”, असं राहुल शेवाळे म्हणाले (MP Rahul Shewale letter to central health minister Harsh Vardhan for vaccination in dharavi).

“धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल, तसेच एक अनोखं उदाहरण यानिमीत्ताने सादर करता येईल”, असंही ते पत्रात म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाची भयावर परिस्थिती, काल तब्बल 60 हजारपेक्षाही जास्त रुग्ण

राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय. राज्यात मंगळवारी (13 एप्रिल) दिवसभरात तब्बल 60 हजार 212 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 281 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे चिंता वाढली आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती

राज्यातील स्थिती चिंताजनक बनली असली तरी मुंबईला मात्र काल दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत काल दिवसभरात 11 हजार 263 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. तर 7 हजार 898 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मुंबईत मंगळवारी 24 तासांत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृतांपैकी 15 जणांना काही दीर्घकालीन आजार होते.

हेही  वाचा : मुख्यमंत्र्यांकडून 5476 कोटींच्या पॅकेजची घोषणा; 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ महिनाभर मोफत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.