एकाच वेळी 10 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फाची तयारी! निलंबित कर्मचाऱ्यांना नोटीस

एकाच वेळी 10 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फाची तयारी! निलंबित कर्मचाऱ्यांना नोटीस
अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर, बडतर्फाच्या कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. ज्या 10 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे त्यांना बडतर्फ का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 14, 2021 | 10:48 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर, बडतर्फाच्या कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. ज्या 10 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे त्यांना बडतर्फ का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, बडतर्फ करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यास सुरुवात झाली असली, तरी एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.

गेला दीड महिना उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. काही कर्मचारी जरी कामावर हजर झाले असले तरी काही कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता. त्यानंतरही कामगार कामावर राहिले नाहीत. त्यानंतर राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आता मोर्चा काढणंदेखील सुरु केलं आहे. पालघरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयावर मूक निषेध मोर्चा काढला. विशेष म्हणजे कर्मचारी आता आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरले आहेत. ज्यात लहान मुलांना सोबत घेऊन कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

सरकारची पगार वाढ कर्मचाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळं संपाला आता दीड महिना झाला आहे. 80 टक्के सेवा ठप्प असल्यानं आता सरकारने बडतर्फाचं पाऊल उचललं आहे.

20 तारखेला विलिनीकरणाचा निकाल

20 तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल. मात्र आत्ता उगाच एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले जात आहे. दिशाभूल करून संप भरकटत आहे. विलीनीकरणाचा मुद्दा समितीच्या माध्यमातूनच सुटणार आहे, अशी प्रतिक्रिया एसटीच्या संपावर आणि विलीनीकरणावर अनिल परब यांनी दिली आहे. तोपर्यंत कामावर या असे आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा केले आहे.

इतर बातम्या

Raj Thackeray | लोक मला फुकट घालवत आहे, राज ठाकरेंनी बोलून दाखवली सल…

Obc reservation : ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलनाची हाक, या मागण्यांसाठी उतरणार रस्त्यावर

कोरेगाव भीमाच्या विकासासाठी 100 कोटी, शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य सरकार पार पाडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

(MSRTC ready to sack 10,000 ST employees! Notice will be sent to the suspended employees)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें