मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, सर्वत्र फटाक्यांचा बार, एअर क्वालिटी इंडेक्स 125 पार

गुरुवारी मुंबईमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी मध्यम स्वरूपाची होती. हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक 162 होता. तर, शुक्रवारी मात्र ही हवा अतिवाईट स्वरूपाची होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, सर्वत्र फटाक्यांचा बार, एअर क्वालिटी इंडेक्स 125 पार
Air pollution
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 4:43 PM

मुंबई: देशाची राजधानी दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील घसरली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर वाजवण्यात आलेल्या फटाक्यानंतर हवेची गुणवत्ता घसरलीय. सर्वत्र फटाके फुटल्याने मुंबईत एयर क्वालीटी इंडेक्स 125 वर पोहोचलाय.मरीन ड्राईव्ह परिसरात धुरकट वातावरण निर्माण झालंय.

शुक्रवारी हवेची स्थिती अतिवाईट होण्याची शक्यता

गुरुवारी मुंबईमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी मध्यम स्वरूपाची होती. हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक 162 होता. तर, शुक्रवारी मात्र ही हवा अतिवाईट स्वरूपाची होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

हवेतील पीएम 2.5 चे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा सर्वाधिक परिणाम कुलाबा, माझगाव येथे दिसतोय. या खालोखाल वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर आणि मालाड येथे हवेची गुणवत्ता खालावू शकते, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

नेरुळची हवा अतिधोकादयक आहे, तेथील एअर क्वालिटी इंडेक्स 316 वर पोहोचलाय. बोरीवलीत एक्युआय 153 वर आहे. मुंबईतील अनेक भागात सध्या धुरकट वातावरण निर्माण झालंय. सध्या हवामान बदलाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. उष्ण-दमट हवामान, पावसाळा यामुळे हवा दूषित होत श्वसनाचे विकारही जडत आहेत. महापालिका या आजारांना अटकाव करण्यासाठी काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नवी दिल्लीत एकदा प्रदूषणाचा कहर

नवी दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा कहर निर्माण झालाय. राजधानीतील एअर क्वालिटी इंडेक्स 400 वर पोहोचला आहे. अनेक ठिकाणची दृश्यमानता फक्त 50 मीटर वर गेलीय. राजधानी नवी दिल्लीत दिवाळीत फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आलीय. मात्र,दिल्लीकरांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. नवी दिल्लीत अजून दोन दिवस प्रदूषणाचा विळखा कायम राहणार आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast : कोकण, मराठवाडा ते दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी

उद्या भाऊबीज, पंकजाताईंकडून शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणतात, अजूनतरी नाही पण …

Mumbai Air Quality low after crackers blast in Diwali

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.