मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

मुंबई महापालिकेने केलेल्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. (Mumbai antibodies found in more than 50 percent of children bodies)

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज
Corona Mumbai
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 2:39 PM

मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये होणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai antibodies found in more than 50 percent of children bodies)

मुंबईतील 24 वॉर्डमध्ये सेरो सर्व्हे 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 24 वॉर्डमध्ये मे आणि जून महिन्यात 6 ते 18 वयोगटांतील लहान मुलांचा सर्व्हे करण्यात आला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे वर्तवल्याचे जात आहे. या पार्श्वभूमीवर सेरो सर्व्हे करण्यात आला होता.

यात मे आणि जून महिन्यात 6 ते 18 वयोगटांतील लहान मुलांचा सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी एकूण दहा हजार मुलांचे नमुने घेण्यात आले होते. मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडी आढळल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत 5 ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबईची सज्जता पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत 7 हजार बेडची तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर 2, कांजूरमार्ग या 5 ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हे नवे कोरोना सेंटर उभारण्याचा काम सुरु आहे.

मुंबईत उभारण्यात येणारे नवे कोविड सेंटरचे 70 टक्के बेड ऑक्सिजनयुक्त असणार आहे. तर यात काही विशेष पेडियॉट्रीक वॉर्डही असणार आहे. मुंबईतील मालाड येथील कोविड सेंटर येत्या आठ दिवसांत सुरु केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  यांनी दिली आहे

लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड

मुंबईतील मालाड कोविड सेंटरमध्ये 2170 बेड उपलब्ध आहेत. हे सेंटर तिसऱ्या लाटेसाठी पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे. यात मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर 2, कांजूरमार्ग या पाच ठिकाणांचा समावेश आहे. यात लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध करण्यात आला आहे. यात एकूण 7000 बेड उपलब्ध होणार आहेत मुलासोबत त्यांच्या पालकांना देखील राहण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे, असेही सुरेश काकाणी म्हणाले.

(Mumbai antibodies found in more than 50 percent of children bodies)

संबंधित बातम्या : 

Mumbai Corona | 5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज

कोरोनाची तिसरी लाट गंभीर, एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, धनंजय मुंडेंचा संकल्प

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.