AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑटो न चालवता रिक्षाचालक दरमहा कमवायचा 5 लाख, मुंबई पोलिसांची 12 जणांवर मोठी कारवाई

ऑटो न चालवता दरमहा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावणाऱ्या 12 रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे ऑटोवाले एका खास युक्तीने पैसे कमवत होते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

ऑटो न चालवता रिक्षाचालक दरमहा कमवायचा 5 लाख, मुंबई पोलिसांची 12 जणांवर मोठी कारवाई
Auto Driver
| Updated on: Jun 15, 2025 | 4:01 PM
Share

मुंबईतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑटो न चालवता दरमहा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावणाऱ्या 12 रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे ऑटोवाले एका खास युक्तीने पैसे कमवत होते. एका व्यक्तीने याबाबत लिंक्डइन पेजवर याबाबत माहिती शेअर केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. हे रिक्षाचालक कसे पैसे कमवत होते ते जाणून घेऊयात.

राहुल रुपाणी यांची पोस्ट

समोर आलेली माहिती अशी की, राहुल रुपाणी हे व्हिसा कामासाठी अमेरिकन दूतावासात गेले होते. त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी शेअर आला होता. राहुल रुपाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘मी माझ्या व्हिसा अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन दूतावासात गेलो होतो, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी मला बॅग आत नेता येणार नाही अशी माहिती दिली. तसेच तिथे लॉकरही नव्हते. त्यावेळी माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता.’

बॅग सांभाळण्यासाठी एक हजाराची मागणी

राहुल रुपाणी यांनी पुढे सांगितले की, ‘मी पर्याय शोधत असताना फूटपाथवर उभा होतो. त्यावेळी एक ऑटो ड्रायव्हर तिथे आला आणि त्याने 1000 रुपये द्या, मी तुमची बॅग सुरक्षित ठेवतो अशी ऑफर दिली. सुरुवातीला मी घाबरलो पण नंतर बॅग त्याच्याकडे ठेवली. त्यानंतर मला या व्यक्तीच्या व्यवसायाची माहिती मिळाली. तो एका दिवसात 20-30 ग्राहकांच्या बॅगा हाताळतो, प्रत्येकाकडून 1000 रुपये घेतो असे तो दरमहा 5-8 लाख रुपये कमवतो.’

पोलिसांची कारवाई

राहुल रुपाणी यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि मुंबई पोलिसांकडे पोहोचली. यानंतर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी व्हायरल ऑटो चालकासह इतर 12 लोकांना बोलावले जे अमेरिकन दूतावासा बाहेर अशाच प्रकारची लॉकर सेवा चालवत होते. या ऑटो चालकांना लॉकर सेवा चालवण्याची किंवा जवळच्या दुकानांमध्ये वस्तू साठवण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती.’

लॉकर सेवा बंद

पोलिसांनी पुढे सांगितले की, ‘या अशा प्रकारच्या सेवेमुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ऑटो चालकाकडे प्रवाशांना नेण्याचा परवाना होता, मात्र लॉकर सेवा चालवण्याचा परवाना नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणाची चौकशी केली आणि आता ही अनधिकृत लॉकर सेवा बंद करण्यात आली आहे.’

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.