Mumbai Byculla Fire : मुंबईतील भायखळा परिसरात भीषण आग, 10 ते 12 फायर इंजिन घटनास्थळी

बईतील माझगाव भायखळा परिसरामध्ये सप्तश्री मार्गावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग मोठ्या स्वरुपाची असून दहा ते बारा फायर इंजन घटनास्थळी दाखल आगीवर मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय.

Mumbai Byculla Fire : मुंबईतील भायखळा परिसरात भीषण आग,  10 ते  12 फायर इंजिन घटनास्थळी
Mumbai Byculla Fire

मुंबई: मुंबईतील माझगाव भायखळा परिसरामध्ये सप्तश्री मार्गावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग मोठ्या स्वरुपाची असून दहा ते बारा फायर इंजन घटनास्थळी दाखल आगीवर मिळवण्यात यश आलं आहे.  लाकडी फर्निचरच्या गोडाऊन आणि दुकानांना आग लागल्याची माहिती आहे. काही वर्षापूर्वी देखील भायखळा परिसरात आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये किती नुकसान झालंय यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, कुलिंग ऑपरेशन सुरु

भायखळा परिसरातील सप्तश्री मार्गावरील मुस्तफा बाजार परिसरातील लाकडाच्या वखारीत ही आग लागली आहे. ही  आग लेवल 2 स्वरुपाची होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याठिकाणी घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तैनात आहेत. भायखळा परिसरात मोठ्या प्रमाणात वखारीचं मार्केट आहे. या परिसरातील वखारीला आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.

आग नेमकी कधी लागली

मुंबईतील भायखळा परिसरातील मुस्तफा बाजार परिसररातील लाकडाच्या गोडाऊनला आग  सकाळच्या वेळी लागली. ही आग लेव्हल 2 स्वरुपाची होती. या आगीमध्ये नेमकं किती नुकसान झालं आणि यामध्ये जीवितहानी झाली की नाही यांसदर्भातील माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे, अशी माहिती मिळतेय.

2019 मध्येही या परिसरात आग

2019 मध्ये मुस्तफा बाजार परिसरतील एका गोडाऊनला आग लागली होती. 28 ऑगस्ट 2019 रोजी मुस्तफा बाजार भागातील एका वखारीला आग लागली होती. त्या आगीमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला 6 तास लागले होते.

 इतर बातम्या:

मोठी बातमी: मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत, अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2 हजार घरे, नेमकी कुठे आहेत ही घरं?

मध्ये प्रदेश पोलिसांचा अजब कायदा, लांब मिशा ठेवल्या म्हणून हवालदाराचे निलंबन, सोशल मीडियावर एकच चर्चा

Mumbai Byculla Fire live updates major fire outbreak in wooden shops in mazgaon Byculla

Published On - 7:43 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI