Mhada Mumbai lottery 2022 | मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत, अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2 हजार घरे, नेमकी कुठे आहेत ही घरं?

म्हाडाने याआधी 2018 साली सोडत काढली होती. त्यावेळेस फक्त 218 घरं होती. पण आता 4 हजार घरं असतील. जुलैमध्ये ज्या घरांची सोडत निघणार आहे, त्याचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.

Mhada Mumbai lottery 2022 | मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत, अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2 हजार घरे, नेमकी कुठे आहेत ही घरं?
मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांची सोडत निघणार

मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे. कारण गेल्या तीन एक वर्षापासून मुंबईत म्हाडाने घराची सोडतच काढलेली नाही. पण ही प्रतिक्षा आता संपण्याची चिन्हं आहेत. कारण नव्या वर्षात म्हणजेच जुलैमध्ये म्हाडा मुंबईत 4 हजार घरांची सोडत काढणार असल्याचं वृत्त आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनानं मुंबईकरांचं कंबरडं मोडलेलं आहे. पण घराची आस काही संपलेली नाही. बजेट बिघडल्यामुळे बिल्डर्सची न परवडणारी घरं मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरची झालीयत असं वाटत असतानाच म्हाडा घरांची लॉटरी घेऊन येत आहे. पण त्यासाठीही अर्थात सात महिने वाट बघावी लागणार आहे. म्हणजेच मुंबईकरांना घर घेण्यासाठी तयारीला पुरेसा वेळ मिळणार आहे.

कुठे आहेत ही घरं?
म्हाडाची ही घरं आहेत गोरेगावच्या पहाडी परिसरात. 4 हजार घरांपैकी सर्वाधिक घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील. तीही वन बीएचके. 23 मजल्यांच्या सात इमारतींमध्ये 1239 घरं उपलब्ध असतील. उन्नतनगर क्रमांक 2 इथेही अत्यल्प उत्पन्न गटासाठी 708 घरं असतील तर अल्प उत्पन्न गटासाठी 736 घरे असतील. मध्य उत्पन्न गटासाठी 227 घरी उपलब्ध असणार आहेत. तर उच्च उत्पन्न गटामध्ये 105 घरांचा समावेश असेल. गोरेगावनंतर म्हाडाकडून अँटॉप हिल, कन्नमवारनगर तसच दक्षिण मुंबईतल्या घरांचाही सोडतीत समावेश केला जाणार आहे. जवळपास 1 हजार घरं या भागात उपलब्ध होणार आहेत.

का महत्वाची आहेत ही घरं?
एक तर गेल्या तीन एक वर्षांपासून मुंबईत म्हाडाने घरांची सोडतच काढलेली नाही. त्यातही अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरेच उपलब्ध नसायची. त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किंमती आणि बिल्डर्सच्या घरांच्या किंमतीत फार फरक असायचा नाही. ती कसर कदाचित आता भरुन निघण्याची शक्यता आहे. कारण तीन वर्षानंतर अत्यल्प उत्पन्न गटासाठी दोन हजार घरं असतील. तीही वन बीएचके. म्हाडाने याआधी 2018 साली सोडत काढली होती. त्यावेळेस फक्त 218 घरं होती. पण आता 4 हजार घरं असतील. जुलैमध्ये ज्या घरांची सोडत निघणार आहे, त्याचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.

हे सुद्धा वाचा:ट्रॅक्टर-कारची भीषण धडक, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

मध्ये प्रदेश पोलिसांचा अजब कायदा, लांब मिशा ठेवल्या म्हणून हवालदाराचे निलंबन, सोशल मीडियावर एकच चर्चा

‘ई-पीक पाहणी’ आता ‘ई- गिरदावरी’, महाराष्ट्रातील यशानंतर राजस्थानात राबवला जाणार हा उपक्रम

Published On - 7:36 am, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI