AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकर गारठले, 11 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद, कुठे किती तापमान?

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, थंडीचा कडाका वाढला आहे. सांताक्रूझमध्ये ११ वर्षांतील सर्वात कमी १६.२°C तापमान नोंदवले गेले. थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि ला-निनामुळे थंडी वाढत आहे, ज्यामुळे हवामानाची गुणवत्ताही खालावली आहे.

मुंबईकर गारठले, 11 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद, कुठे किती तापमान?
mumbai winter
| Updated on: Nov 20, 2025 | 8:38 AM
Share

गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. त्यातच मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेताना पाहायला मिळत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यातच मुंबईकरांना थंडीने हुडहुडी भरली आहे. आज सकाळी सांताक्रूझ वेधशाळेत 16.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. जे गेल्या ११ वर्षांतील सर्वात कमी तापमान ठरले आहे. यामुळे यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातील आजची सकाळ गेल्या दहा वर्षातील सर्वात थंड सकाळ म्हणून नोंदवली गेली आहे.

मुंबईच्या या तापमानाने ११ नोव्हेंबर २०१६ मधील नीचांक मोडला आहे. या काळात सरासरी तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवण्यात आले होते. या किमान तापमानाने थेट पाच अंशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकर थंडीने अक्षरशः कुडकुडले. केवळ मुंबईतच नाही, बदलापूरसारख्या उपनगरात पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे बदलापूर अक्षरशः महाबळेश्वरप्रमाणे गारठून गेले होते. मुंबईत थंडी वाढल्यामुळे आज सकाळपासूनच धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिणामी हवेची गुणवत्ता खालावून AQI १७० पर्यंत पोहोचला आहे.

महाराष्ट्रात कुठे किती तापमान?

ठिकाण किमान तापमान (∘C)
सांताक्रूझ १६.२ ११ वर्षांतील नीचांक
कुलाबा २१.६
बदलापूर ११.०
पुणे ९.४ राज्यातील थंड शहरांपैकी एक
लोणी काळभोर ६.९ राज्यातील सर्वात कमी तापमान

थंडी वाढण्यामागे कारण काय?

यंदा नोव्हेंबरमध्येच थंडी वाढण्यामागे अनेक कारण समोर आली आहेत. सध्या मध्य आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्याने हे थंड वारे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात येत आहेत. तर काही हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांच्या परिणामामुळे वातावरणातील बाष्पाचा अभाव वाढला आहे. ज्यामुळे थंडीची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासोबतच मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झाल्यामुळे वातावरणातील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. ज्यामुळे थंडीची चाहूल लवकर लागली आहे.

जागतिक हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा ला-नीना हवामान प्रक्रिया अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. ला-नीना कार्यकरत झाल्यास तापमानात मोठी घट होते आणि यंदा नेहमीपेक्षा जास्त कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला