Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

मुंबई शहरात आज 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 490 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण, 6 जणांचा मृत्यू
कोरोना
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 7:49 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) आता अधिक वेगानं होताना दिसत आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात (Mumbai City) आज 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 490 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्वीटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 20 ङजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मुंबई शहरात सध्या 91 हजार 731 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87 टक्क्यांवर आहे.

तसंच पेडणेकर यांनी काल ट्वीटरद्वारे मुंबईतील आठवडाभराची कोरोना आकडेवारी दिली होती. त्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कशाप्रकारे वाढत गेली हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे धोका दिवसागणिक वाढतो आहे. नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. तिसरी संभाव्य लाट थोपवणे आपल्याच हाती आहे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

मिनी लॉकडाऊनची शक्यता – महापौर

संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. पण काही नागरिक बेफिकीर राहिले तर आगामी काळात लॉकडाऊन करावा लागू शकतो. घाबरण्यापेक्षा काळजी घ्या. आपण प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत. डॉक्टर्स, बेस्टचे कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. ओमिक्रॉन हा गंभीर स्वरुपाचा नाही, असं समजू नका. तसं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. त्याला गंभीर समजलं तर पुढे कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागणार नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

इतर बातम्या :

Jaish E Mohammed : आता नागपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी, पोलीस सज्ज

‘शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, पटोलेंची खोचक टीका

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.