Mumbai COVID-19 Information | मुंबईत रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर काय करायचं? उपचार कुठे, बेड कसा मिळणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

Mumbai COVID-19 Information | मुंबईत रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर काय करायचं? उपचार कुठे, बेड कसा मिळणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
mumbai corona

तुम्हाला पालिकेच्या http://stopcoronavirus.mcgm.gov.in/covid-testing-facility या लिंकवर उपलब्ध आहे. (Mumbai COVID-19 Information)

Namrata Patil

|

Apr 07, 2021 | 5:06 PM

मुंबई : राज्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला कोरोनाचा विळखा बसू लागला आहे. मुंबईत दररोज दहा हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरते का? असा सवाल उपस्थित होत आहे. (Mumbai COVID-19 Information Beds availability corona test)

स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत कामानिमित्त गावावरुन आलेले, स्थालांतर केलेले मजूर, कामगार यांसारखे अनेक जण राहतात. या सर्वांना मुंबईची फार कमी माहिती असते. त्यातच एखाद्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला किंवा लक्षणं दिसत असतील तर मग एकट्या मुंबईत कुठे जायचं, काय करायचं, कुठे उपचार, कुठे टेस्ट करायची याची काहीही माहिती नसते. मग अशावेळी पूर्ण गोंधळ उडतो. याच या सर्वांची आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहोत. मुंबई महापालिकेच्या http://stopcoronavirus.mcgm.gov.in/about-coronavirus या वेबसाईटवर ही सर्व माहिती उपलब्ध आहे.

1) मुंबई शहरात/जिल्ह्यात टेस्ट कशी होते?

मुंबई शहरात तसेच उपनगरात पालिकेच्या सर्व रुग्णालयात कोरोना चाचणी केली जाते. तसेच मुंबईतील 24 वॉर्डात पालिकेने विविध कोव्हिड टेस्टिंगची केंद्र सुरु केली आहेत. या केंद्रात कोरोनाची चाचणी मोफत केली जाते. यात अँटीजेन आणि RTPCR अशा दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात.

त्याशिवाय मुंबईतील जवळपास 54 खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली जाते. या लॅबमध्ये चाचणीसाठी साधारण 1000 रुपये ते 1800 रुपये आकारले जातात. मुंबईतील रुग्णालय, चाचणी केंद्र, खासगी लॅब यांसह अनेक ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते. याची सर्व यादी तुम्हाला पालिकेच्या http://stopcoronavirus.mcgm.gov.in/covid-testing-facility या लिंकवर उपलब्ध आहे.

2) मुंबईत कोरोना चाचणी कशी होते? त्यासाठी किती वेळ लागतो?

मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये साधारण 10 सार्वजनिक कोरोना चाचणी केंद्र, पालिका रुग्णालय आणि खासगी लॅबमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोना चाचणी होण्यास अजिबात वेळ लागत नाही. मुंबईतील कोरोनाची स्वॅब टेस्ट करण्यात येणार आहे. नेझल अॅस्पिरेट टेस्ट, ट्रेशल अस्पिरेट, सप्टम आणि रक्त चाचणी अशा प्रकारे कोरोनाची टेस्ट केली जाते.

मुंबईतील सर्वच कोरोना चाचणी केंद्रात लगेचच टेस्ट केली जाते. त्यामुळे कोणत्याही रुग्णाला तात्कळत बसावे लागत नाही.

3) मुंबईत कोरोना टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी किती वेळ लागतो? तोपर्यंत रुग्णाने काय करायचं?

मुंबईत कोरोना चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी साधारण 24 तास लागतात. तोपर्यंत त्या रुग्णाला जर लक्षण असतील तर त्याने क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जातो. तसेच जर एखादा रुग्ण अतिगंभीर असेल तर तो स्वत:हून पालिका रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात दाखल होऊ शकतो.

4) एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाने कुठे जायचं?

एकदा पॉझिटिव्ह रुग्ण आला तर महापालिकेकडून त्यांना फोन जातो. पालिकेने 24 विभागात 24 वॉर रुम तयार केले आहेत. त्या वॉर रुममध्ये महापालिकेचे अधिकारी आणि डॉक्टर बसलेले असतात. एखादा रिपोर्ट आला की तो पाहून रुग्णाला कोणत्या प्रकारच्या बेडची आवश्यकता आहे हे पाहिलं जातं. त्यानंतर रुग्णाला खासगी किंवा पालिकेच्या रुग्णालयात बेड उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर रुग्णाचा अॅड्रेस घेऊन अॅम्ब्युलन्स पाठवली जाते.

एखाद्या रुग्णाला खासगीत उपचार हवे असतील तर खासगीमधील बेड चेक केले जातात, ऑक्सिजनची गरज असेल तर तेही चेक केलं जातं. खासगीत ऑक्सिजन नसेल तर महापालिकेत ऑक्सिजन असल्याचं रुग्णाला सांगितलं जातं आणि वॉररुममधून त्याला अॅडमिट केलं जातं. रुग्णाला कोणताही खर्च द्यावा लागत नाही. पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. परंतु, खासगीमध्ये सरकारने जे काही शुल्क निर्धारित केले आहे, ते रुग्णाला द्यावे लागेत. रुग्णाला संपर्क करण्यासाठी पालिकेने वॉररुमही जाहीर केले आहेत. (Mumbai COVID-19 Information Beds availability corona test)

5) मुंबईत बेडस पुरेशा, पण संख्या वाढतेय

मुंबईत दिवसाला सरासरी दहा हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पालिकेच्या माहितीनुसार मुंबईत पुरेशा प्रमाणात बेड्स आहेत. पण कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सध्या 3993 बेड्स रिकाम्या आहेत. 7 एप्रिल सकाळी 10 पर्यंतचा हा आकडा आहे. मुंबईत सुमारे 17 हजार बेड्स फुल्ल झाल्या आहेत. तर 136 आयसीयू बेड्स रिकाम्या असून 51 व्हेंटिलेटर बेड्सही रिकाम्या आहेत.

6) मुंबईत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास यावर संपर्क साधा 

A – 022-22700007 B – 022-23759023/ 022-23759025 C – 022-22197331 D- 022-23835004/ 8879713135 E- 022-23797901 F South – 022-24177507/ 8657792809 F North – 022-241011380/ 8879150447/ 8879148203 G South – 022-24219515/ 7208764360 G- North – 022-24210441/ 8291163739 H- East – 022-26635400 H West – 022-26440121 K East – 022-26847000/ 8657933681 K West – 022-26208388 P South – 022-28780008/8828476098/7304776098 P North – 022-2844001/ 9321598131 R South – 022-28054788/ 8828495740 R North – 022-28947350/ 8369324810 R Central – 022-28947360/ 9920089097 L – 7678061274/ 7304883359/ 7710870510 M East – 022-25526301/ 7208680538/ 7208590415 M West – 022-25284000 N- 022-21010201 S – 022-25954000/ 9004869724 T- 022-25694000

मुंबईत दिवसभरात 10 हजारापेक्षा अधिक रुग्ण

गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 10 हजार 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर 7 हजार 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 77 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आज दिवसभरात 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 19 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 20 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर येऊन ठेपलाय. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.79 टक्के झाला आहे. (Mumbai COVID-19 Information Beds availability corona test)

संबंधित बातम्या : 

मुंबईत आहात आणि तुमची चाचणी पॉझिटीव्ह आली, काय करायचं? ‘या’ नंबरवर संपर्क करा

Aurangabad Corona | बेड्सची उपलब्धता ते कोरोना चाचणी केंद्र, औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती काय?

Jalgaon COVID-19 Information | जळगावात कोरोनाचं थैमान, जर तुम्हाला कोरोना झालाय, ऑक्सिजन बेड हवाय तर काय कराल?

Mumbai Corona Vaccine : मुंबईकरांच्या चिंतेत भर, 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें