‘जीआर’ निघाला, ‘क्यूआर’ मिळेना, लोकल प्रवासासाठी डबेवाले वेटिंगवर

राज्य सरकारने मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी दिली आहे. (Mumbai Dabbawala didn't get QR Code For Local train)

'जीआर' निघाला, 'क्यूआर' मिळेना, लोकल प्रवासासाठी डबेवाले वेटिंगवर

मुंबई : राज्य सरकारने ‘अनलॉक 5′ साठी महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या. त्यात मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. पण लोकल प्रवासासाठी क्यूआर कोड घेणं बंधनकारक असल्याने काही डबेवाल्यांनी रेल्वे प्रशासनाकडे त्याची मागणी केली. मात्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितल्याने डबेवाल्यांचा हिरमोड झाला आहे. (Mumbai Dabbawala didn’t get QR Code For Local train)

मुंबईच्या डबेवाल्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने डबेवाल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली आहे. मात्र लोकलमधून प्रवास करण्यासाठी डबेवाल्यांना मुंबई पोलिसांनी दिलेला क्युआर कोड असणे बंधनकारक असणार आहे. तरच एमएमआरमध्ये लोकलमध्ये डबेवाल्यांना प्रवेश मिळणार आहे.

त्यानुसार क्यूआर कोड काढण्यासाठी गेलेल्या डबेवाल्यांना क्यूआर कोड नाकारण्यात आला. राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले.

क्‍युआर कोडची चौकशी करण्यासाठी “मुंबई डबेवाला असोसिएशन’चे पदाधिकारी मध्य रेल्वे कार्यालयात गेले होते. मात्र त्यांना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलावे, असे सांगण्यात आले.

डबेवाल्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, लोकलने प्रवास करण्याबाबतचा कोणताही जीआर आमच्याकडे आलेला नाही. ज्यावेळी हा जीआर येईल तेव्हा डबेवाल्यांनी क्‍युआर कोडसाठी अर्ज करावा, असा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे.

त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या डबेवाल्यांचा क्यू आर कोड न मिळाल्याने हिरमोड झाला आहे.

ओळखपत्र ग्राह्य धरत प्रवासाला अनुमती देण्याची मागणी 

तर दुसरीकडे अनेक डबेवाल्यांकडे अॅनरॉईड मोबाईल नाही. त्यामुळे अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असलेल्या डबेवाल्यांना क्यूआर कोड मिळवणे अवघड जाणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांकडे स्वत:चे ओळखपत्र आहे, ते ओळखपत्र ग्राह्य धरत त्यांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.(Mumbai Dabbawala didn’t get QR Code For Local train)

संबंधित बातम्या : 

Unlock 5 | मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर, अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी

वात पेटली आहे, भडका होऊ शकतो, डबेवाले राज ठाकरेंना भेटले

Published On - 9:59 am, Sun, 4 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI