AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित (Mumbai food market open) केला.

Corona : मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा
| Edited By: | Updated on: Mar 26, 2020 | 8:25 AM
Share

मुंबई : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित (Mumbai food market open) केला. त्यामुळे सर्व दुकानं, खासगी कंपन्या, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा या बंद ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठा बंद राहिल्याने लोकांना भाज्या मिळत नव्हत्या. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मुंबई कृषी उत्पन बाजार समिती सुरु ठेवण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठ व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे.

बाजारपेठ सुरु होणार असल्याने बाजारपेठेच्या गेटवर महत्त्वाची सूचनाही लावण्यात आली आहे. या सूचनेमध्ये म्हटले की, व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार, वाहतूकदार, माथाडी कामगार, मापाडी आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझरने हात धुवून आणि मास्क तोंडाला बांधून मार्केटमध्ये प्रवेश करावा. जर या सुचनेचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि संबंधीतावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक नियोजन करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी आडवू नये, असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

बाजारपेठा बंद असल्याने भाज्यांचा तुटवडा होत होता. त्यामुळे नागरिकांनाही भाज्या मिळत नव्हत्या. भाज्या मिळत नसल्याने भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. तसेच बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत होते. त्यामुळे बाजारपेठा सुरु करण्यात येत आहे.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.