Nisarga Cyclone : मुंबई शहराचे पालकमंत्री मध्यरात्रीही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मढ-भाटीत मच्छिमारांची भेट

मुंबईचे पालकमंत्री असल्म शेख यांनी 'निसर्ग' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाटी, मढ आणि इतर किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये जाऊन तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन (Aslam Shaikh visit Madh beach) केले.

Nisarga Cyclone : मुंबई शहराचे पालकमंत्री मध्यरात्रीही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मढ-भाटीत मच्छिमारांची भेट
Follow us
| Updated on: Jun 03, 2020 | 11:14 AM

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाटी, मढ आणि इतर किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये जाऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन (Aslam Shaikh visit Madh beach) केले. मुंबईत आज (3 जून) निसर्ग वादळ धडकणार आहे. त्यामुळे मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थेट किनारपट्टीजवळील गावांना भेट दिली (Aslam Shaikh visit Madh beach).

एक मंत्री या संकटाच्या काळात एवढ्या रात्री आपल्याला धीर देण्यासाठी येतो. ही बाब येथील मच्छीमारांना या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आत्मविश्वास देणारी ठरत आहे.

“एवढ्या वर्षांमध्ये अनेक वादळं आली पण एकही मंत्री आम्हाला कधी भेटायला आला नाही. हे पहिले मंत्री असे आहेत जे या कठिण काळात एका सामान्य माणसाप्रमाणे आम्हाला धीर देण्यासाठी आलेत. आता हे तुफान देखील आमचं काही बिघडवू शकत नाही.”, असं भाटी संस्थेचे उपचेअरमन लक्ष्मण कोळी म्हणाले.

रात्रीचे 2 वाजले तरी मंत्री अस्लम शेख यांच्या गावकऱ्यांसोबत गाठी-भेटी घेण्याचा सिलसिला चालू होता. अस्लम शेख यांनी गावात जाऊन भेट दिल्याने तेथील नागरिकांनाही आनंद झाला.

‘निसर्ग’ चक्रीवादळाची थोडक्यात माहिती

? अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळ निर्माण झाले

? या चक्रीवादळाला बांगलादेशने ‘निसर्ग’ नाव सुचवले आहे.

? 3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात, रायगड, हरिहरेश्र्वर आणि दमण भागातून जाण्याचा इशारा

? रत्नागिरी, पालघरसह मुंबईवरही चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता

चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र

1. प्रथमोपचार पेटी तयार ठेवा, औषध गोळ्या असू द्या 2. पाणी उकळूनच प्या, थंड पाणी टाळा 3. सगळी इलेक्ट्रीक उपकरणं बंद करा, गॅसही बंद ठेवा 4. दारं, खिडक्या बंद ठेवा 5. घराचं काम पूर्ण करा, टोकदार गोष्टी बांधून ठेवा 6. तुमची महत्वाची कागदपत्रं वॉटरप्रुफ करून ठेवा 7. मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा 8. जर तुमचं घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाण गाठा (Preparedness for Nisarga Cyclone by Maharashtra Government) 9. मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका 10. विद्युत तार, खांब यापासून दूर राहा 11. समुद्रात किंवा किनारी जाऊ नका 12. जनावरं, प्राण्यांना बांधून न ठेवता मोकळं सोडा 13. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत राहा 14. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका 15. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळेच्या वेळेला लक्षात असू द्या

संबंधित बातम्या :

CYCLONE NISARGA LIVE | ‘निसर्ग’ चक्रीवादळ 12 वाजता अलिबागला धडकण्याची शक्यता, मुंबईहून 190 किमी अंतरावर

Nisarga Cyclone | निसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्री

Cyclone Nisarga | चक्रीवादळ मुंबई-कोकणाच्या उंबरठ्यावर, राज्य सरकारकडून काय काय तयारी?

Nisarga Cyclone | 3 जून दुपारी अलिबाग ते वरळी, 4 जून मध्यरात्री 2 वणी ते शिरपूर, धुळे मार्गे मध्य प्रदेश

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.