AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हायकोर्टात वकील ओझांना फटकारलं, थेट कारवाईचे आदेश; काय घडलं?

वकील निलेश ओझांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. न्यायाधीशांवर केलेले आरोप न्यायव्यवस्थेचा अवमान असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

मुंबई हायकोर्टात वकील ओझांना फटकारलं, थेट कारवाईचे आदेश; काय घडलं?
nilesh oza
| Edited By: | Updated on: Apr 08, 2025 | 4:32 PM
Share

अॅड. निलेश ओझा यांना मुंबई हायकोर्टाने फटकारले आहे. निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन चुकीची विधाने केली होती. त्यामुळे कोर्टाने त्यांना फटकारले असून त्यांच्यावर थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वकील निलेश ओझा चांगलेच गोत्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने वकील निलेश ओझांविरोधात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली होती. निलेश ओझा यांनी रेवती मोहिते डेरे यांच्यावर आरोप केले होते. हे गंभीर आरोप होते. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि अन्य ४ न्यायाधिशांचे एकत्रित बेंचने यावर सुनावणी केली. त्यासोबतच 5 न्यायाधीशांसमोर हायकोर्टात सुनावणी पार पडली.

यावेळी हायकोर्टात निलेश ओझा यांचा एक बाईट ऐकवण्यात आला. पाच न्यायाधीशांनी हा बाईट ऐकला. या बाईटमध्ये क्लोजर रिपोर्टबद्दल निलेश ओझा हे वक्तव्य करत होते. या पत्रकार परिषदेत निलेश ओझा यांनी न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याच वक्तव्याने न्यायालयाचा अवमान झाल्याने हायकोर्टाने सुमोटो घेतल्याचं स्पष्ट झाले आहे.

या सुनावणीसाठी निलेश ओझा हायकोर्टात उपस्थित नव्हते. मात्र हायकोर्टात वकील निलेश ओझा यांची वादग्रस्त पत्रकार परिषद ऐकवण्यात आली. ⁠निलेश ओझा यांची ही क्लिप कोर्टासमोर आली, त्यानंतर ती ऐकली.  श्रीमती रेवती मोहिते डेरे आणि निला गोखले यांच्यासमोर असलेली याचिका होती. त्यासंदर्भातली क्लिप होती, ती समोर आलेली आहे. त्यात रेवती मोहिते डेरे यांच्यावर निलेश ओझा यांनी आरोप केले आहेत. वंदना चव्हाण या डेरे यांच्या बहीण आहेत, त्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत असा या क्लिपमध्ये उल्लेख होता.

रेवती मोहिते डेरे यांच्याबद्दलची तक्रार निलेश ओझा यांनी राष्ट्रपतींकडे केली असा उल्लेख यात करण्यात आला होता. चंदा कोचर यांच्या प्रकरणाचाही ओझा यांनी उल्लेख केला. मात्र या सगळ्यावरून त्यांनी न्यायाधीशांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या १ तारखेला म्हणजेच दोन तारखेच्या सुनावणीच्या आदल्या दिवशी ही पत्रकार परिषद घेतली होती. २ तारखेला निलेश ओझा यांनी ही याचिका सारंग कोतवाल यांच्या बेंचकडे वर्ग करावी अशी विनंती केली आणि रजिस्ट्रीकडे तसे निर्देश दिले, असे सर्व या याचिकेत नमूद करण्यात आले.

मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं?

यावेळी कोर्टाने निलेश ओझा यांना चांगलेच सुनावले आहे. कोर्टवर असे आरोप करणे, न्यायाधीशांवर आरोप करणे म्हणजे न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखं आहे. निलेश ओझा यांनी केलेली वक्तव्य कोर्टाचा अवमान करणारी आहेत. त्यांनी चुकीची वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळे ते कारवाईस पात्र आहेत, यावर कोर्ट समधानी आहे. निलेश ओझा यांच्यावर सबंधित कारवाईचे आदेश आम्ही जारी करत आहोत, असे हायकोर्टाने म्हटले.

२९ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

निलेश ओझा हे व्हिडीओ कॉलद्वारे या सुनावणीसाठी जोडले गेले आहेत. निलेश ओझा काहीतरी बोलू पाहत होते, मात्र कोर्टाने सबंधित प्रकरणाची नोटीस स्वीकारा मग बोलू असे सांगितले. आता येत्या २९ एप्रिलला निलेश ओझा यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ही वक्तव्य ज्या माध्यमांवर अपलोड झाली आहेत, ती तात्काळ हटवावी, असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?