VIDEO | मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये 20 फूट पाणी, 400 वाहनं बुडाल्याची भीती

ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बीएमसीच्या पे अँड पार्किंगमध्ये जवळपास 400 गाड्या (कार आणि रिक्षा) पार्क करण्यात आल्या आहेत. मात्र पार्किंगमध्ये 20 फुटांच्या वर पाणी साचल्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं.

VIDEO | मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये 20 फूट पाणी, 400 वाहनं बुडाल्याची भीती
ठाकूर कॉम्प्लेक्समधील मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये 20 फूट पाणी
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 11:47 AM

मुंबई : शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर उपनगरातील अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या हजारो गाड्या पाण्याखाली गेल्या. कांदिवली भागात ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्किंगमध्येही पावसाचं पाणी साचलं. अंडरग्राऊण्ड पार्किंगमध्ये 20 फुटांच्या वर पाणी साचल्यामुळे जवळपास 400 वाहनं बुडाल्याची माहिती आहे.

पार्किंगमध्ये 20 फुटांच्या वर पाणी

रात्री चार तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. अनेक जणांच्या घरात पाणी शिरले, तर रस्त्यावर गाड्या अडकून पडल्या. ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बीएमसीच्या पे अँड पार्किंगमध्ये जवळपास 400 गाड्या (कार आणि रिक्षा) पार्क करण्यात आल्या आहेत. मात्र पार्किंगमध्ये 20 फुटांच्या वर पाणी साचल्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं.

रिक्षाचालकांना मोठा फटका

अग्निशमन दलाकडून पार्किंगमध्ये साचलेलं पाणी काढण्याचं काम सुरु आहे. याचा सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसला आहे. कोरोना काळात शेकडो रिक्षा या पार्किंगमध्ये पार्क केल्या जात होत्या. याशिवाय काही आलिशान कारही इथे पार्क करण्यात आल्या होत्या.

भाजप-मनसेची महापालिकेकडे भरपाईची मागणी

बीएमसी पे अँड पार्क करत असल्यास नुकसान झाल्यावर त्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेने घ्यावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नगरसेविका सुनिता यादव यांनी केली आहे. तर, आपल्याकडे अडीचशेहून अधिक गाड्या बुडाल्याची तक्रार आल्याचं मनसे विभाग प्रमुख हेमंत कांबळे यांनी सांगितलं. इन्शुरन्स कंपनीद्वारे क्लेम करण्याबाबत बातचित सुरु आहे. मात्र बीएमसी जर रिक्षा चालकांकडून महिन्याचे 900 रुपये पार्किंग शुल्क घेत असेल, तर गाड्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही त्यांना घ्यावी लागेल, असं मनसेचं म्हणणं आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेला, नालासोपाऱ्यातील 4 वर्षांचा चिमुरडा अद्यापही बेपत्ता

VIDEO | मुंबईत साचलेल्या पाण्यातून चालताना बापलेक अडखळून पडले, पोलिसाची मदत

(Mumbai Kandivali Thakur Complex BMC Pay and park water logging 400 cars rickshaw might drown)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.