Video : थोडक्यात निभावलं! सीएसएमटी स्थानकात लोकलचा मोठा अपघात टळला, लोकल रुळावरुन घसरुन बफरला धडकली

हार्बर लाईन वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे. मात्र सुदैवानं थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. 

Video : थोडक्यात निभावलं! सीएसएमटी स्थानकात लोकलचा मोठा अपघात टळला, लोकल रुळावरुन घसरुन बफरला धडकली
मुंबई लोकल अपघातImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 11:14 AM

मुंबई : मुंबईतील हार्बर रेल्वे (Harbour Railway Local) वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी (CSMT Station) स्थानकात लोकलचा डबा रुळावरुन घसरला. त्यामुळे या मार्गावरील लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे. सध्या या मार्गावरची वाहतूक पूर्वपदावर आणण्याचं काम सुरु आहे. पनवेल लोकल पनवेल ऐवजी सीएसएमटी (Panvel CSMT Local News) स्थानकातून मागच्या दिशेने गेली. त्यामुळे लोकलचा डबा घसरला आणि प्लॅटफॉर्मला धडकला. तसंच लोकल बफरला धडकली. यामुळे प्रवाशांना आता नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे. हार्बरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, एक ते दोन तासांत हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येईल, असं सांगितलं जातंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकलचा डबा प्लॅटफॉर्मला धडकल्यानंतर लगेचच रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ :

रेल्वे अधिकारी काय म्हणाले?

मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना शिवाजी सुतार यांनी म्हटलंय, की…

हे सुद्धा वाचा

सीएसएमटीहून पनवेलला जाणारी ही लोकल होती. ही लोकल पुढे जाण्याऐवजी मागे गेली आणि बफरला धडकली. त्यामुळे हार्बरल लाईनच्या एका प्लॅटफॉर्मवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही गाड्या गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या आहेत, त्या रद्द करण्याचा विचारही केला जातोय. दरम्यान, मध्य रेल्वेची मेन लाईन म्हणजेच कर्जत, कसारा खोपोली या वाहतुकीवर कोणताही खोळंबा झालेला नाही. हार्बरवरील काही गाड्या आता वडाळ्यापर्यंतच चालवल्या जाणार आहे. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरुन वाहतूक सुरु आहे.

हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना यामुळे आता फटका बसणार आहे. वडाळा ते सीएसएमटी वाहतूक कशी पूर्ववत होते, हे पाहणं आता महत्त्वाचं राहिल. गर्दीची वेळ जरी टळली असली, तरी हार्बर लाईन वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे. मात्र सुदैवानं थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

तांत्रिक चूक की ह्युमन एरर?

दरम्यान, लोकलचा हा अपघात थोडक्यात टळला असला तरी नेमकं असं कशामुळे घडलं? यात चूक कुणाची? तांत्रिक टूक होती की हा ह्युमन एरर होता, याचाही आता तपास केला जाईल. त्यानुसार भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी काळजी घेतली, जाईल, असंही रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलंय.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.