AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai local Mega block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, मेगा ब्लॉकचा टायमिंग काय?

Mumbai local Mega block : मुंबईत रविवारी तिन्ही मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. या मेगा ब्लॉकचा वेळ काय असेल? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल ते जाणून घ्या.

Mumbai local Mega block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, मेगा ब्लॉकचा टायमिंग काय?
Railway Local Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2023 | 12:43 PM
Share

मुंबई (नंदकिशोर गावडे ) : लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं. मुंबईत दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनशिवाय मुंबईची कल्पनाच करता येत नाही. मुंबईत दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या 70-75 लाखाच्या पुढे आहे. सिग्नल किंवा अन्य कारणांमुळे लोकल सेवा काही मिनिटांसाठी जरी विस्कळीत झाली, तर पुढच सगळ वेळापत्रक कोलमडत. कर्जत-कसारा, पालघर, डहाणू इथून दररोज लोकल प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पहाटेच्या पहिल्या ट्रेनपासूनच तुम्हाला गर्दी दिसेल. रात्री उशिरापर्यंत ट्रेनने प्रवास सुरु असतो. लोकलमुळे मुंबईकरांच जीवन मोठ्या प्रमाणात सुसहय झालय. ट्रेनच्या वेळेवर मुंबईकरांच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कामावर वेळेत पोहोचण्यासाठी आणि कामावरुन निघाल्यानंतर घरी जाण्यासाठी प्रत्येकाची वेळ ठरलेली असते.

ठरलेली ट्रेन चुकली, तर काहीवेळा चिडचिड होते. मुंबईत लोकलच वेळापत्रक कोलमडल तर लगेच रेल्वे स्थानकात गर्दी होते. मुंबईत सहसा तुम्हाला लोकल रिकामी मिळत नाही. प्रवाशांना खच्चून भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करावा लागतो. लोकल ही मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अगदी सुट्टीच्या दिवशी रविवारी सुद्धा लोकलला मोठी गर्दी असते. रविवारी लोकल आणि रुळांच्या देखभालीची काम केली जातात. उद्या रविवार आहे. मुंबईकरांनो उद्या तुम्ही ट्रेन प्रवासासाठी घराबाहेर पडणार असाल, तर तिन्ही मार्गावरच वेळापत्र एकदा बघूनच बाहेर पडा. कारण उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. किती वाजता असेल मेगा ब्लॉक ?

उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेची तांत्रिक काम करण्यासाठी उद्या मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर सीएसटी ते विद्या विहार अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते 3.55 दरम्यान मेगा ब्लॉक असेल.

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 दरम्यान मेगा ब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन मार्गावर 10.35 ते 3.35 दरम्याने मेगा ब्लॉक असेल.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.