AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local : सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु, तिकीट काऊंटरवर प्रवाशांची लगबग

मुंबई उपनगरीय लोकल (Mumbai Local) आजपासून (1 फेब्रु) सर्वसामान्य नागरिकांना सुरु करण्यात आली आहे. | Mumbai local started for the general Mumbaikar public

Mumbai Local : सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु, तिकीट काऊंटरवर प्रवाशांची लगबग
Mumbai Local Ticket Counter
| Updated on: Feb 01, 2021 | 8:18 AM
Share

मुंबईमुंबई उपनगरीय लोकल (Mumbai Local) आजपासून (1 फेब्रु) सर्वसामान्य नागरिकांना सुरु करण्यात आली आहे. वेळेचं बंधन ठेऊन का होईना परंतु सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु झाली आहे. नोकरीनिमित्त तसंच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवासांच्या सेवेत मुंबई लोकल आजपासून दाखल झाली आहे. (Mumbai local started for the general Mumbaikar public With a lot of passengers at the ticket counter)

कोरोना संसर्गामुळे गेले अनेक महिने लोकल बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर स्टेशनकडे फिरकले नाहीत. मात्र आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झाल्याने सामान्य प्रवाशांसाठी दिलासा आहे. आज पहाटेपासूनच तिकीट काऊंटरवर प्रवाशांची लगबल पाहायला मिळाली.

आजपासून जरी मुंबई लोकल सेवा सुरु झाली असली तरी रेल्वे स्थानकात वेळेत त्यांना तिकिटाचे मिळत नसल्याचे चित्र नालासोपारा रेल्वे स्थानकात पाहायला मिळाले. एक ते दीड तासापासून लोकांना रांगेत उभं रहावं लागलं. सकाळी पहिल्या ट्रेनपासून सकाळी 7 पर्यंतच लोकलमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रत्येक रेल्वेस्थानकावर तिकीट खिडक्या वाढवणे गरजेचे होते पण त्या वाढवल्या नसल्याने तिकिटासाठी प्रवाशांना लांबच लांब रांगा लावून सुद्धा वेळेत तिकीट मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळालं.

ज्या प्रवाशांना रांगा लावूनही वेळेत तिकीट मिळालं नाही त्या प्रवाशांनी मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे. एकतर प्रवास करण्याला वेळेची अट आणि दुसरीकडे प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे पहिल्या दिवसाच्या लोकल प्रवासावर विरजन पाहायला मिळालं.

रेल्वेनं सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेचं बंधन घातलं आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 ही वेळ सोडून उर्वरित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

दिलेल्या वेळेशिवाय कुणी सर्वसामान्य नागरिक लोकल प्रवास करताना आढळून आला तर त्याला 200 रुपये दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांना विशिष्ट वेळेतच प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी वेळेपूर्वी सामान्यांना तिकीट देण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रशासनानं घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लोकल प्रवास करताना वेळेची मर्यादा पाळणं अत्यंत गरजेचं बनलं आहे.

कधी प्रवास करता येईल…?

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

कधी प्रवास करता येणार नाही…?

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

(Mumbai local started for the general Mumbaikar public With a lot of passengers at the ticket counter)

हे ही वाचा :

Mumbai Local : मुंबईकरांनो लोकल प्रवास करताना वेळ पाळा, नाहीतर तुरुंगात जाल!

Mumbai Local train latest update : सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सुरु

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.