मुंबईची लाईफलाईन पुन्हा कोलमडली, हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे….

पनवेल ते वाशी स्थानकादरम्यानची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या तासाभरापासून या मार्गावरुन एकही लोकल धावलेली नाही.

मुंबईची लाईफलाईन पुन्हा कोलमडली, हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे....
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 8:15 AM

Mumbai Local Train Update : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पण मुंबईकरांच्या मागे लागलेले विघ्न काही संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली मुंबई लोकल आज पुन्हा एक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. सध्या मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक सेवा कोलमडली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय लोकल सेवेतील हार्बर मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे.

हार्बर रेल्वे वाहतूक सेवा कोलमडली

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय लोकल सेवेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हार्बर रेल्वे वाहतूक सेवा कोलमडली आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. तसेच प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

नेरुळ स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर रेल्वे मार्गावरील नेरुळ स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. याचाच परिणाम सध्या लोकल सेवेवर पाहायला मिळत आहे. यामुळे पनवेल ते वाशी स्थानकादरम्यानची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या तासाभरापासून या मार्गावरुन एकही लोकल धावलेली नाही. सध्या नेरुळसह पनवेल भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. सध्या हार्बर रेल्वेवरील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

अनेक प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

सध्या हार्बर मार्गावरील पनवेल ते सीएसटीएम ही वाहतूक सध्या उशिराने सुरु आहे. तर पनवेल ते ठाणे या दिशेने जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प आहे.  त्यामुळे अनेक प्रवाशी हे जीव मुठीत घेऊन रेल्वे ट्रॅकवरुन चालत प्रवास करत आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेही उशिराने

तर दुसरीकडे आज मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे. कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणाऱ्या गाड्या 10 ते 12 मिनिट उशिराने सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाड आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही सध्या उशिराने धावत आहे.

प्रवाशांचा मोठा खोळंबा

मुंबईतील लाखो नागरिक हे सकाळी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. तर काही विद्यार्थी आपपल्या शाळा-कॉलेजला जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.