Manora Amdar Niwas | 900 कोटींचा खर्च, नवीन मनोरा आमदार निवास प्रकल्पासाठी लवकरच कंत्राटदार नेमणार

बांधकाम क्षेत्रातील दिग्गज टाटा, एलअँडटी आणि शापूरजी पालनजी या तीन कंपन्यांनी मनोरा आमदार निवास पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. त्यानुसार लवकरच या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला कंत्राट देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते.

Manora Amdar Niwas | 900 कोटींचा खर्च, नवीन मनोरा आमदार निवास प्रकल्पासाठी लवकरच कंत्राटदार नेमणार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 12:59 AM

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मनोरा आमदार निवास पुनर्विकास प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. मात्र प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला नवीन वर्ष उजडणार आहे. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज टाटा, एलअँडटी आणि शापूरजी पालनजी या तीन कंपन्यांनी मनोरा आमदार निवास पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. त्यानुसार लवकरच या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला कंत्राट देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते.

कंत्राटदार कंपनी निश्चित न झाल्यामुळे काम अद्याप बंद

नव्या मनोरा आमदार निवासाचे उद्घाटन 2019 साली जुलै महिन्यात करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन झाले होते. मात्र या नव्या मनोरा आमदार निवसाचे काम अद्याप सुरु झालेले नाही. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्ष उजाडणार आहे. 900 कोटींच्या या प्रकल्पासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र कंत्राटदार कंपनी निश्चित न झाल्यामुळे काम अद्याप बंद आहे. टाटा , शापूरजी पालनजी आणि एल अँड टी या कंपन्यांनी नविदा भरलेल्या आहेत. उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर अंतिम कंत्राट दिलं जाणार आहे. त्यानंतर मनोरा आमदार निवासाच्या प्रस्तावित इमारतीचे बांधकाम सुरु होईल.

नव्या मनोरा आमदार निवास प्रकल्पाचे वैशिष्य काय ?

या नव्या आमदार निवासात तब्बल आठशे खोल्या असणार आहेत. तसेच ही एक 34 मजली इमारत असून एकूण बांधकाम 7.72 लाख चौरस फुटाचे असणार आहे. सभागृहाची आसन क्षमता ही 240 असेल. ही इमारत सर्व सोईसुविधांनी युक्त असून येते वाहनतळ, दवाखाना, दुकाने, भोजनकक्ष यांची व्यवस्था असेल. येथे चित्रपट, वाचनालयदेखील असेल.

इतर बातम्या :

Omicron Task Force Meeting | टास्क फोर्सची बैठक संपली, कठोर निर्बंध, बुस्टर डोसवर चर्चा; अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार

Omicron Update | ओमिक्रॉन व्हेरियंट ‘सुपर माईल्ड,’ तूर्तास महाराष्ट्रात निर्बंध नाही, सरकारचं स्पष्टीकरण

महाविकास आघाडीकडून ओबीसींची फसवणूक, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, चंद्रकांतदादांचा इशारा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.