मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या आणखी दोन मार्गांचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए चे काम येत्या 3 ते 5 महिन्यांत पूर्ण होईल. म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान या दोन मार्गांशी जोडलेले प्रवासी मेट्रोमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकतील. एमएमआरडीएचे आयुक्त (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-एमएमआरडीए) एस. श्रीनिवास यांनी ही माहिती दिली आहे. (Mumbai Metro to run on two routes in next three-four months; In the final stages of preparation)