AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोनो डार्लिंग पुन्हा सेवेत येणार ! नव्या आधुनिक रुपात मोनोरेल लवकरच धावणार…

मोनोरेल सार्वजनिक सेवेसाठी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. या मार्गावर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अपघात झाल्यानंतर ही सेवा बंद करण्याच आली होती. आता दुरुस्ती आणि अद्यायावत सिग्नल यंत्रणेचे उभारणी झाली आहे.त्यामुळे मोनोरेल पुन्हा धावण्यास सज्ज झाली आहे.

मोनो डार्लिंग पुन्हा सेवेत येणार ! नव्या आधुनिक रुपात मोनोरेल लवकरच धावणार...
Mumbai Monorail Back On Track soon
| Updated on: Feb 20, 2026 | 10:38 PM
Share

मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. देशातील एकमेव मोनोरेल असलेल्या मुंबई मोनोरेलची पुन्हा सुरुवात होणार आहे. सप्टेंबर महिन्यात घडलेल्या अपघातानंतर चेंबुर ते सात रस्ता हा मोनोरेल मार्ग दुरुस्ती आणि आधुनिकीकरण करण्यासाठी बंद करण्यात आला होता. आता या मार्गावर CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणाली आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे लवकरच आणखी काही तांत्रिक बाबी झाल्यानंतर मुंबई मोनो डार्लिंग पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

गेल्यावर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबई लोकल सेवा विस्कळीत असल्यामुळे मोनोरेलला प्रचंड गर्दी झाली. आणि त्यामुळे दोन मोनोरेल अति वजनामुळे बंद पडल्या होत्या. त्यानंतर तासभर प्रवासी अडकून पडले होते. अधिक डबाच्या दरवाजा तोडून क्रेनच्या सहाय्याने ५०० प्रवाशांची सुटका करण्याची नौबत प्रशासनावर आली. त्यानंतर पुन्हा सप्टेबर २०२५ मध्ये मोनोरेला अपघात झाला.त्यामुळे नवीन रोलिंग स्टॉक आणि CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणाली उभारणीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला होता.

CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणाली

चेंबुर ते सातरस्ता अशी १९.५४ किमीचा कॉरिडॉर असलेल्या मुंबई मोनोरेला आता नवीन, अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि वेगवान करण्यात आले आहे. मोनोरेलने आपल्या नवीन रोलिंग स्टॉक आणि CBTC-आधारित सिग्नलिंग प्रणालीसाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता (Independent Safety Assessor) ची भूमिका पार पाडणाऱ्या ‘ब्युरो व्हेरिटास’ या जागतिक स्तरावरील चाचणी आणि तपासणी प्रमाणीकरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने हे प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

प्रक्रिया अंतिम टप्प्यात

हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सुधारित मोनोरेल सार्वजनिक सेवेसाठी सुरू करण्याच्या दिशेने आपण आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता संपूर्ण १९.५४ किमी मोनोरेल कॉरिडॉरच्या सर्वसमावेशक तपासणीसाठी आणि प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी अंतिम मंजूरी मिळणे शिल्लक आहे. याकरिता सेवानिवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती केली जाणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मोनोरेल पुन्हा प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...