मुंबईतील मुलुंडमधील अपार्टमेंटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Mumbai mulund fire : मुंबईतील मुलुंडमधील अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुलुंड स्टेशन परिसरातील ही घटना आहे. सहा मजल्याच्या इमारतीत ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुंबईतील मुलुंडमधील अपार्टमेंटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 2:39 PM

मुंबई : मुंबईत मुलुंडमध्ये अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुलुंड स्टेशन परिसरातील ही घटना आहे. या ठिकाणी असलेल्या सहा मजल्याच्या इमारतीमधील या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावर काही नागरिक अडकले होते.  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि बचाव व मदत कार्य वेगाने सुरु करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका केली. तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.

मुलूंडमधील धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळाली नाही. परंतु अचानक लागलेल्या या आगीमुळे धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी त्वरित अग्नीशमन दलास फोन केला. त्यानंतर काही वेळेत अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत काय हानी झाली का? याची माहित अद्याप उपलब्ध झाली नाही.

आगीवर नियंत्रण

मुलुंड स्टेशन परिसरात असलेल्या धीरज अपार्टमेंटच्या चौथ्या मजळ्यावर भीषण आग लागली. सहा माळ्याची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावर काही नागरिक अडकले होते. त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी सुखरूप सुटका केली. तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. पोलिस व अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ होता तो टळला.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.