Nalasopara : गरिमाच्या आक्रोशाने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू, नालासोपाऱ्यात अनेक संसार उघड्यावर
या कारवाईमुळे अनेक कुटुंबं बेघर झाली असून लोकांमध्ये संतापाची भावना आहे. गरिमा शिवसहाय गुप्ता, ही वसईतील जी जी जे वर्तक विद्यालयात दहावीची विद्यार्थिनी आहे, तिच्यावर या घटनेचा खोल परिणाम झाला.

मुंबईला लागून असलेल्या नालासोपाऱ्यामध्ये सध्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु आहे. 34 बेकायद इमारती पाडण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाने बेकायद बांधकाम हटवताना 400 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. या कारवाईनंतर 200 कुटुंब बेघर होतील. नालासोपारा पूर्वेला अग्रवाल नगरी येथील लक्ष्मी नगरमध्ये डंपिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी आरक्षित भूमिवर 41 बेकायद इमारती बांधण्यात आल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने या इमारतींना बेकायद ठरवून पाडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच पालन करताना वसई-विरार महानगर पालिकेने 34 इमारतीमधील रहिवाशांना 22 जानेवारी 2025 पर्यतं घर खाली करण्याची नोटीस बजावली होती.
वसई-विरार महानगरपालिकेकडून नालासोपा-यात सुरू असलेल्या तोडक कार्यवाहीमुळे दहावीत शिकणाऱ्या गरिमा गुप्ता हिच्या आक्रोशाने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. या कारवाईमुळे अनेक कुटुंबं बेघर झाली असून लोकांमध्ये संतापाची भावना आहे. गरिमा शिवसहाय गुप्ता, ही वसईतील जी जी जे वर्तक विद्यालयात दहावीची विद्यार्थिनी आहे, तिच्यावर या घटनेचा खोल परिणाम झाला.
ते पाहून तिने हंबरडा फोडला
आज तिची हिंदीची परीक्षा होती, ज्यासाठी तिने कठोर तयारी केली होती. मात्र, परीक्षा संपल्यानंतर ती घरी परत आली तर तिच्या डोळ्यादेखत घर उध्वस्त होताना पाहिलं. ते पाहून तिने हंबरडा फोडला. गरिमाचे आई-वडिल हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, माझ्या आई वडिलांनी कष्ट करून हे घर उभारलं होतं. याच घरात माझं भविष्य होतं. अचानक झालेल्या कारवाईमुळे आमच्या आयुष्याचा आधार हिरावला गेल्याची प्रतिक्रिया गरिमान् दिली आहे.
‘आम्ही आता कुठे जावं’
गरिमाच्या शैक्षणिक आयुष्यावरही या प्रकाराचा गंभीर परिणाम झाला आहे. आता बेघर झालेली गरिमा व तिचं कुटुंब पुढच्या वाटचालीसाठी चिंतेत आहे. “भाजपा सरकार लोकांना मोफत घर देण्याचे स्वप्न दाखवत आहे. मात्र इकडे आमच्या कष्टाच घर आमच्या डोळ्या समोर उध्वस्त केलं जात आहे. आम्ही आता कुठे जावं” असा प्रश्न ती सर्वांना विचारत आहे..