Mumbai NCB Raid: मुंबई एनसीबीकडून मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

Mumbai NCB Raid: मुंबई एनसीबीकडून मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक
मुंबई एनसीबीकडून दीड कोटीचा गांजा जप्त

या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का याचा शोध एनसीबीकडून घेण्यात येत आहे. ड्रग्जचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यात असून ज्या व्यक्तीला अटक केली गेली आहे त्या व्यक्तीचा मोबाईलही जप्त केला गेला आहे.

महादेव कांबळे

|

May 14, 2022 | 5:07 PM

मुंबईः मुंबईतील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (Narcotics Control Bureau) मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज (Drugs worth Rs 1.5 crore) जप्त केले असून याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही (Arrest) करण्यात आली आहे. मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईत आणखी कोणाचा समावेश आहे याचाही तपास करण्यात येत असून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. त्या मोबाईलद्वारेच आता या प्रकणातील आणखी काही संशयितांचा शोध घेण्याचे काम एनसीबीकडून सुरु आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का याचा शोध एनसीबीकडून घेण्यात येत आहे. दीड कोटीचे ड्रग्ड सापडले असल्याने या प्रकरणाचा मास्टरमाईंडचा शोध घेणे सुरु आहे.

या व्यक्तीकडून मिळणार माहिती

मुंबईतील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (मुंबई एनसीबी) मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एनसीबीने एका व्यक्तीला अटकही केली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा संशय एनसीबीला आहे. ज्या व्यक्तीला अटक केली गेली आहे, त्या व्यक्तीची चौकशी करुन उर्वरित लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

संपूर्ण नेटवर्क ट्रेस

संपूर्ण नेटवर्क ट्रेस करण्यासाठी अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या कारवाया करून एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याने खळबळ उडाली आहे. एनसीबीकडून जाहीर करण्यात आलेले जे प्रसिद्धी पत्रक आहे त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (13 मे) रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत 1770 किलो गांजा (हायड्रोपोनिक वीड- गांजा) जप्त करण्यात आला आहे. मुंबई एनसीबीचे विभागीय अधिकारी अमित घावटे यांनी ही माहिती दिली आहे.

परदेशातून गांजा

मुंबई एनसीबीने याप्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवाया करून सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले गेले आहेत. एनसीबीकडून झालेल्या पहिल्या कारवाईत पोस्ट ऑफिसमधून परदेशातून आलेल्या पार्सलमधून अमेरिकेतून 850 ग्रॅम गांजा पाठवण्यात आल्या होता. तो गांजाही जप्त केला गेला आहे.

त्या व्यक्तीवर दहा गुन्हे

हा गांजा मुंबईतील ताडदेव येथे राहणाऱ्या एका व्यक्तीकडे पाठवण्यात आला होता. या व्यक्तीला पकडण्यात मुंबई एनसीबीला यश आले होते. चौकशीत हा आरोपी पहिल्यापासूनच गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींवर एकूण 10 गुन्हे दाखल झाले असून चौकशीत तो मुंबईतील एका कुख्यात ड्रग्ज तस्करासाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मोबाईलद्वारे तपास करणार

मिळालेल्या माहितीनुसार हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अटक केल्या गेलेल्या व्यक्तीकडून कोणा कोणाचे धागेदोरे मिळतात याचा शोधही तपास यंत्रणा करत आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून अजून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नसली तरी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईलचा वापर करुन याप्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे याची माहिती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एनसीबीकडून कसून चौकशी

दीड कोटीचा अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने मुंबई एनसीबीकडून कसून चौकशी सुरु केली गेली आहे. याआधी एनसीबीकडून अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई केली गेली होती त्यावेळी एनसीबी आणि अधिकारी चर्चेत आले होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें