AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वानखेडे कुटुंबियांनी राज्यपालांची भेट घेतली, नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, 2 गुन्हे दाखल

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सध्या एकमेकांच्या विरोधात मैदानात आहेत. त्यांच्यासोबतीला राजकीय कुस्तीच्या फडात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री झालीय.

वानखेडे कुटुंबियांनी राज्यपालांची भेट घेतली, नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, 2 गुन्हे दाखल
समीर वानखेडे परिवाराने राज्यपालांची भेट घेतली.
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 8:04 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सध्या एकमेकांच्या विरोधात मैदानात आहेत. त्यांच्यासोबतीला राजकीय कुस्तीच्या फडात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री झालीय. काल नवाब मलिक-फडणवीस एकमेकांविरोधात मैदानात उतरले. बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी मुंबईत जमीन खरेदी केली, असा खळबळजनक दावा केला. तर फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, हे आम्ही उद्या पत्रकार परिषदेत उघडे पाडू, असा इशारा मलिकांनी दिला. यादरम्यान वानखेडे परिवाराने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्या कानावर घातल्या. तिकडे औरंगाबादमध्ये वानखेडे कुटुंबाकडून मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. तर इकडे गोरेगावमध्येही एफआायआर दाखल करण्यात आलाय.

वानखेडे कुटुंबीयांकडून राज्यपालांची भेट

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वानखेडे यांच्या कुटुंबियांनी राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिलं आहे. राज्यपालांनी सर्व काही ठीक होईल, असं आश्वासन दिल्याचं ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यावर क्रांती रेडकरने पत्रकारांशी संवाद साधला. क्रांती म्हणाली, “आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं आहे.आम्ही खऱ्याची लढाई लढत आहोत. आम्हाला राज्यपालांचा पाठिंबा हवा आहे. त्याबाबत राज्यपालांनी आश्वासन दिलं आहे.”

मी अशीच लढत राहणार. राज्यपालांकडून आम्हाला मदतीचं आश्वासन मिळालेलं आहे. ती स्फुर्ती घेऊन आम्ही अधिक ताकदीने लढणार आहोत. जी सत्य परिस्थिती आहे ती राज्यपालांकडे मांडली. आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं जात आहे. इज्जत आणि अब्रूवर टीका केली जात आहे. टॉन्ट मारले जात आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती राज्यपालांकडे मांडली आहे. राज्यपालांनी सांगितलं की सत्याचा विजय नक्की होईल. राज्यपालांची भेट सकारात्मक झाली आहे. सगळी काही सविस्तर माहिती आम्ही देऊ शकत नाही, असं क्रांती रेडकरने सांगितलं.

औरंगाबाद, वाशिम, मुंबईत मलिकांविरोधात गुन्हे दाखल

त्याचवेळी समीर वानखेडे यांच्या मेहुणी हर्षदा रेडकर यांनीही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरही कायदेशीर कारवाईसाठी पावलं उचलली आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर वानखेडे यांच्या नातेवाईकांनी औरंगाबाद येथील नवाब मलिक यांच्याविरोधात एससी-एसटी कायद्यांतर्गत तक्रारही दिली आहे.

यापूर्वी, समीर वानखेडे यांच्या वडिलांनी एससी-एसटी कायद्यांतर्गत दोन तक्रारी दिल्या होत्या. ज्यामध्ये एक तक्रार वाशिमला आणि दुसरी तक्रार ओशिवरामध्ये देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

‘उदय शेट्टी मजनूमध्ये त्यांचा घुंगरू शेठ झालाय’, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

समीर वानखेडेंच्या कुटुंबीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, सत्याचा विजय नक्की होईल- क्रांती रेडकर

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.