AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरण, आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

मुंबई आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याने आपले जीव संपवल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करुन पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते. आज आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर केले होते.

आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरण, आरोपीला न्यायालयाने सुनावली 'ही' शिक्षा
आयआयटी विद्यार्थी मृत्यू प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडीImage Credit source: Google
| Updated on: Apr 15, 2023 | 2:45 PM
Share

मुंबई / ब्रिजभान जैस्वार : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी आरोपी अरमान खत्रीला मुंबई सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे. अरमान खत्रीची आज पोलीस कोठडी संपत असल्याने विशेष पोलीस एसआयटीने त्याला मुंबई सत्र न्यायालय विशेष अॅट्रोसिटी कोर्टात हजर केले. सुनावणी दरम्यान वाढीव पोलीस कोठडीची मागणी एसीआयटीकडून करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. बचाव पक्षाने अरमानच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दर्शनच्या मोबाईलचा एफएसएल रिपोर्ट प्राप्त

आम्हाला दर्शनच्या मोबाईलचा तात्पुरता एफएसएल रिपोर्ट प्राप्त झाल्याचे सरकारी पक्ष आणि पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं. या रिपोर्टमध्ये दर्शनने अरमानची माफी मागितली असल्याचं स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी कोर्टात केला. “अरमान मुझे माफ कर दे, मै मुंबई छोड कर घर जा रहा हुं,” असा संदेश दर्शनने अरमानला पाठवला असल्याचं एसआयटीकडून कोर्टात सांगण्यात आलं.

प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

तसेच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचं एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या कॉलेज सुरू असल्याने सह विद्यार्थी आणि इतर सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास उशीर लागत असून, वाढीव पोलीस कोठडीची मागणी एसआयटीने केली.

अरमानच्या जामीन अर्जावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मात्र या मागणीला विरोध करत या आधीच सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, रिमांड अर्जात काहीच नवीन नसल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला. तसेच अरमान काही सराईत गुन्हेगार नसून, तो तपासाला सहकार्य करत असल्याचा दावाही बचाव पक्षाने केला. अरमानला न्यायालयीन कोठडी मिळताच त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. लवकरच त्यावर सुनावणी अपेक्षित आहे, अशी माहिती अरमान खत्रीचे वकील अॅड. दिनेश गुप्ता यांनी दिली.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.