AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल, पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये एकूण 16 ठिकाणी वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू उत्पादन करणाऱ्या संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे.

ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल, पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु
मुंबई महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 9:14 AM
Share

मुंबई : कोरोना संकटाचा सामना करताना महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या 5 रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. (Mumbai Oxygen Generation Plant Work Started In Five Hospitals)

मिशन ऑक्सिजनला सुरुवात

काही दिवसांपूर्वी मुंबईत कोरोना रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासली होती. यावेळी काही रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं होतं. तेव्हापासून मिशन ऑक्सिजन सुरु आहे. कोव्हिड-19 बाधित रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय प्राणवायू (Medical Oxygen) उपलब्ध करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये एकूण 16 ठिकाणी वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू उत्पादन करणाऱ्या संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे.

पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

मुंबई महापालिकेची ऑक्सिजन निर्मिती प्रक्रियेत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. यात वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, वांद्र्यातील भाभा रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, कूपर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालय या पालिकेच्या पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे प्रक्रिया सुरु आहे.

मुंबईत ऑक्सिजनअभावी 168 पालिका रुग्णालयातील दीडशे रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला होता. इतकेच नाही तर, दुसऱ्या लाटेदरम्यान एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे. मात्र तरीही ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने ही नवीन पाच संयंत्रे सुरू करुण्यात आली आहे.

यात वातावरणातील हवा शोषून त्याद्वारे वैद्यकीय प्राणवायू निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पातून दररोज एकूण 6.93 मेट्रिक टन प्राणवायू उत्पादीत होणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल इत्यादी उपस्थित होते.

मुंबईतील ऑक्सिजन प्लँटचे नेमका कसा चालतो?

?हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँटची वैशिष्ट्य ?या प्लँटची दैनंदिन क्षमता 10 लाख लिटर ऑक्सिजन निर्मितीची आहे ?प्लॅटचा संपूर्ण खर्च हा 70 ते 80 लाख आहे ?लिकक्विड प्लॅटपेक्षा वेगाने ऑक्सिजन निर्मिती ही या प्लॅटमध्ये होते ?सुरुवात हवेतील ऑक्सिजन हा कॉम्फ्रेश मशीन मध्ये खेचून घेतला जातो ?मग पुढे ही हवा फिल्टर करून त्याला तेलजन्य पदार्थ वेगळे केले जातात ?मग यातून हवेतून ऑक्सिजन वेगळा करून प्रेशर केला जातो ?पुढे तो रुग्णालयात रुग्णासाठी पाठवला जातो

ऑक्सिजन प्लांट नेमका कसा तयार होतो?

हवेत आधीच प्राणवायू अर्थात ऑक्‍स‍िजन असताना पुन्‍हा तो शोषून नव्‍याने प्राणवायू कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्‍वाभाव‍िक आहे. वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फ‍िल्‍टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात.

या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्‍स‍िजन जनरेटर’मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट (Zeolit) या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन अर्थात प्राणवायू हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

(Mumbai Oxygen Generation Plant Work Started In Five Hospitals)

संबंधित बातम्या : 

मुंबईत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्लँट, नेमका प्रकल्प कसा काम करतो?

मुंबईच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबईकडे परस्पर वळवल्याचा आरोप, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे FDA ला पत्र

कशी होणार ऑक्सिजन निर्मिती?; कसा असेल मुंबई महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट?; वाचा सविस्तर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.