AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, बॉलीवूड पार्ट्यांमधून शोधत होत्या गरजू मॉडेल अन् कलाकार

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंधेरी पश्चिम येथील पॉश परिसरातून एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु होते. हे रॅकेट चालवणाऱ्या तीन महिलांना अटक केली आहे. त्या महिला बॉलीवूड पार्ट्यांमधून पैशांची गरज असणाऱ्या मॉडेल अन् कलाकार शोधत होत्या.

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, बॉलीवूड पार्ट्यांमधून शोधत होत्या गरजू मॉडेल अन् कलाकार
ipl party
| Updated on: Apr 07, 2023 | 10:51 AM
Share

मुंबई : मुंबई मायानगरीत सेक्स रॅकेटचा प्रकार सुरु असतो.अधूनमधून या बातम्या येत असतात. आता मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत सुरु असणाऱ्या या प्रकारावर मुंबई पोलिसांना छापा टाकला आहे. अंधेरी पश्चिममधील अलिशान भागात चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात एक मॉडेलसुद्धा अडकली आहे. ती एका रात्रीसाठी 2 ते 3 लाख रुपये घेत होती. पोलिसांनी दोन वरिष्ठ महिलांसह तीन महिलांना अटक केली आहे. यासोबतच तीन मॉडेल्सचीही पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

काय होता प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील पॉश परिसरातून एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांना याची माहिती मिळाली. हे सेक्स रॅकेट अतिशय हाय प्रोफाईल पद्धतीने चालवले जात होते. या प्रकरणात मॉडेलसुद्धा सापडल्या. मॉडेलला एका रात्रीसाठी 2 ते 3 लाख रुपये मिळायचे.

आता पोलीस या टोळीशी संबंधित अन्य आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित अनेक मोठे खुलासे होऊ शकतात, असे मानले जात आहे. तीन आरोपी महिलांपैकी दोन आरोपी महिला वृद्ध असून, त्यांचे वय ६५ वर्षे आहे. ती बॉलीवूडच्या मोठमोठ्या पार्ट्यांना हजेरी लावत होत्या. पार्टीदरम्यान या महिला त्या मॉडेल्स आणि टीव्ही कलाकारांशी संपर्क साधतात ज्यांना पैशांची गरज असते आणि त्यांना या कामात गुंतवित होत्या.

कोण आहेत त्या महिला

पोलिसांनी घटनास्थळावरून ६५ वर्षीय सुनीता झा, ६४ वर्षीय मधू आणि ३१ वर्षीय ट्विंकल झा यांना ताब्यात घेतले. आरोपी महिला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एका पॉश इमारतीत राहत होत्या.सुरुवातीला तीन महिला आरोपींपैकी एकाने ज्योतिषी असल्याचे पोलिसांना सांगितले.

ती सुद्धा वेश्याव्यवसायात सामील असल्याचा आरोप आहे. या माहितीवरून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. 5 एप्रिलच्या रात्री सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर अंधेरी पश्चिम येथील शास्त्रीनगर भागातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 405 वर छापा टाकला. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा

पुणे शहरात मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांच्या मोठ्या कारवाईत संचालक जाळ्यात

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.