मुंबई-पुणे मार्गावरील पॅसेंजर गाड्या 15 जानेवारीपर्यंत रद्द

सीएसएमटी-पंढरपूर-सीएसएमटी, पनवेल-पुणे-पनवेल यासह अन्य पॅसेंजर गाड्या पुढील 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत

मुंबई-पुणे मार्गावरील पॅसेंजर गाड्या 15 जानेवारीपर्यंत रद्द
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 8:28 AM

मुंबई : मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मंकी हिल आणि कर्जतदरम्यान तिसऱ्या मार्गिकेवरील काही किरकोळ कामं आणि वेगमर्यादेमुळे पॅसेंजर गाड्या 15 जानेवारीपर्यंत रद्द (Mumbai Pune Cancelled Trains) करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात बोरघाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यान रुळांचं मोठं नुकसान झालं होतं.

सीएसएमटी-पंढरपूर-सीएसएमटी, पनवेल-पुणे-पनवेल यासह अन्य पॅसेंजर गाड्या पुढील 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत, तर कोयना एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे.

पावसाळ्यात बोरघाटातील मंकी हिल आणि कर्जतदरम्यान रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे तिसऱ्या मार्गिकेवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करतानाच अन्य मार्गावरुन वळवण्यात आली होती. पुलाच्या विस्तारासह काही महत्त्वाची कामं पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या मार्गिकेवरील रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र काही किरकोळ कामं अद्यापही बाकी आहेत. या कामांसाठी मंकी हिल ते कर्जतदरम्यान एक्स्प्रेस-पॅसेंजर गाड्यांसाठी प्रतितास 20 किलोमीटरची वेगमर्यादाही आखली आहे.

वेगमर्यादेमुळे अन्य एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे शिल्लक कामं पूर्ण करतानाच वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी पॅसेंजर गाड्या 15 जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

रद्द केलेल्या गाड्या

-पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर गाडी 15 जानेवारी 2020 पर्यंत रद्द -50127 सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर गाडी 2 ते 4 जानेवारी आणि 9 ते 11 जानेवारीपर्यंत रद्द -51028 पंढरपूर-सीएसएमटी पॅसेंजर 3 ते 5 जानेवारी आणि 10 ते 12 जानेवारीपर्यंत रद्द -सीएसएमटी ते बिजापूर 1 जानेवारी, 5 ते 8 जानेवारी आणि 12 ते 15 जानेवारी रद्द -51030 बिजापूर ते सीएसएमटी पॅसेंजर 1 आणि 2 जानेवारी, 6 ते 9 जानेवारी, 13 ते 15 जानेवारीपर्यंत रद्द

15 जानेवारीपर्यंत भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आली असून सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावेल आणि पुण्यातून सुटणार आहे. (Mumbai Pune Cancelled Trains)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.