AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मुसळधार पाऊस, पण पाणीसंकट कायम; तुम्हाला पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी?

मुंबईत गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. वडाळ्यात सर्वाधिक १६१.४ मिमी पाऊस झाला. मात्र, मुंबईच्या धरणांमध्ये पाणीसाठा फक्त ८.६० टक्के आहे. अंधेरी पश्चिममध्ये १९ जून रोजी ११ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, पण पाणीसंकट कायम; तुम्हाला पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी?
mumbai lake
| Updated on: Jun 17, 2025 | 8:43 AM
Share

गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस पाहायला मिळाला. आज मुंबईतील पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत २४ तासांच्या कालावधीत अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पालिकेच्या स्वयंचलित केंद्रांवर झालेल्या नोंदीनुसार मुंबईतील वडाळ्यात सर्वाधिक १६१.४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मात्र मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणक्षेत्रात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मुंबईतील पावसाचा आढावा

गेले दोन दिवस पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मुंबईत पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवारी शहर तसेच उपनगरात पावसाचा जोर होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख ठिकाणांवरील पावसाची नोंद करण्यात आली आहे. यानुसार वडाळ्यात १६१.४ मिमी इतका सर्वाधिक पाऊस झाला. त्यापाठोपाठ माटुंगा १४७.५५ मिमी, लोअर परळ: १४३.४६ मिमी, वरळी अग्निशमन केंद्र १४०.७३ मिमी, वांद्रे (पश्चिम उपनगर): १३४.५९ मिमी, वांद्रे कुर्ला संकुल (अग्निशमन केंद्र): १०३.४ मिमी, चेंबूर (पूर्व उपनगर): १११ मिमी, कुर्ला एल वॉर्ड ऑफिस, पवईतील पासपोली आणि चेंबूर अग्निशमन केंद्र: ८१.७४ मिमी ते ८६.५३ मिमी दरम्यान पावसाची नोंद करण्यात आली.

मुंबईतील कुलाबा वेधशाळेत ८६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर सांताक्रूझ वेधशाळेत १०० मिमी पाऊस झाला. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असला तरी, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मात्र अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या फक्त ८.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे मध्य वैतरणा धरणातील पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले.

सध्याचा धरणातील पाणीसाठा

  • उर्ध्व वैतरणा: ०.९१ टक्के
  • मोडक सागर: २६.०५ टक्के
  • तानसा: ९.३९ टक्के
  • मध्य वैतरणा: १०.६७ टक्के
  • भातसा: ६.०० टक्के
  • विहार: ३३.३० टक्के
  • तुळशी: २८.६२ टक्के
  • एकूण: ८.६० टक्के

अंधेरी पश्चिममध्ये पाणीपुरवठा बंद

दरम्यान अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी १९ जून रोजी ११ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील १,३५० मिलीमीटर व्यासाचे प्रवाह नियंत्रण झडप (फ्लो कंट्रोल वॉल्व्ह) दुरुस्त करणे आणि वेसावे जलवाहिनीवरील १०० मिलीमीटर व्यासाचे फुलपाखरू झडप (बटरफ्लाय वॉल्व्ह) बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. हे काम गुरुवार १९ जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून शुक्रवार २० जून रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत एकूण ११ तास चालणार आहे. या कालावधीत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने के-पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. पालिका प्रशासनाने नागरिकांना या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.