मुंबईतील साकीनाका भागात लागलेली भीषण आग आटोक्यात, 7 ते 8 झोपड्या जळून खाक

गोदामाच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीचा भाग असल्याने आग पसरण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. (Mumbai Sakinaka Slum massive Fire Broke Out) 

मुंबईतील साकीनाका भागात लागलेली भीषण आग आटोक्यात, 7 ते 8 झोपड्या जळून खाक
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 11:04 AM

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरातील खाडी नंबर 3 येथील एका प्लास्टिक गोदामाला लागलेली भीषण आग दोन तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.  अग्निशमन दलाच्या 9 गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गोदामाच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीत ही आग पसरल्याने सात ते आठ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. (Mumbai Sakinaka Slum massive Fire Broke Out)

मुंबईत आज सकाळी 8 च्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील साकीनाका परिसरातील खाडी नंबर 3, सर्वोदय हॉस्पिटल जवळील गोदामाला भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या अग्निशमन दलाच्या 9 गाड्या, 6 जम्बो वॉटर टँकर, 1 वॉटर टँकर, 1 रेस्क्यू वाहन, 1 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. ही आग लेव्हल 2 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका येथे लागलेली ही आग प्रथम एक प्लास्टिकच्या गोदामला लागली होती. त्यानंतर ही आग आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये पसरली. या आगीमुळे आतापर्यंत  सात ते आठ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. पण या ठिकाणी असणाऱ्या गल्ल्या या अतिशय अरुंद असल्याने आगीपर्यंत पोहोचण्यास अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली आहे.

आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी सुदैवाने समोर आलेली नाही. मात्र आगीत झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Mumbai Sakinaka Slum massive Fire Broke Out)

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना दिवाळी भेट! बेस्टच्या ताफ्यात येणार अत्याधुनिक डबल डेकर बसेस

दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, अडीचशेचा टप्पा पार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.