AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घड्याळ-पेनाची किंमत अन् श्रीमंत मित्रांचा दाखला; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Sanjay Raut on BJP Shivsena Eknath Shinde Group NCP Ajit Pawar Group Mahayuti : खरा बाप असता भाजपला खोके वाले बाप घेऊन महाराष्ट्रात...; संजय राऊत यांचं भाजपवर टीकास्त्र. महाविकास आघाडीवरही संजय राऊत यांचा जोरदार निशाणा... संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा...

घड्याळ-पेनाची किंमत अन् श्रीमंत मित्रांचा दाखला; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
| Updated on: Feb 22, 2024 | 10:42 AM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई| 22 फेब्रवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती आणि विशेषत: भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय. नरेंद्र मोदीच्या खिशाला जो पेन आहे तो 25 लाखाचा आहे. मोदीच्या हातातील घड्याळाची किंमत काढा? मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा आहे. मोदींचा विमान ते खास वीस हजार कोटीचे घेतले विमान आहे. मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश आहेत.एकही गरीब किंवा चहा विकणारा नाही हे ढोंग भाजपने बंद केले पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर घणाघात केलाय.

मोदींवर निशाणा

राजकीय झुंडशाही यावर नड्डा यांना बोलावेसे वाटले नाही. जी लूट होत आहे त्यावर मत व्यक्त करता आले नाही. जे पी नड्डांचे मत सर्वात आधी मोदींना लागू होते. इतकी श्रीमंती कुठल्याही पंतप्रधानाने भोगोली नव्हती. जनतेच्या लुटलेल्या पैशांवर इलेक्ट्रॉनबॉण्डचा 7 हजार कोटींचा घोटाळा ही या देशाची लूट आहे. पीएम केयर घोटाळा बोलत नाही. या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीतलं राजकारण केलं आहे खोक्यातील राजकारण केले नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केलाय.

घड्याळ अन्  महागडे सूट; राऊत कडाडले

तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांची हत्या करत आहे गरिबीची थट्टा करत आहे आमदार खासदारांना 50 50 कोटी देऊन सरकार बनवत आहेत. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनगटाचे फोटो काढा कळेल किती महागडे घड्याळ वापरत आहे. घड्याळ वापरणे गुन्हा नाही कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतले. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेने ठरवले आहे यांचे महागडे सूट उतरवायचे महागडे घड्याळ भंगारात टाकायचे. ही जी शाही आहे ती लोकशाही राहील हुकूम शाही जाईल हे आम्हाला माहिती आहे. अजित पवार गट, मिंधे  गट, अमुक गट हे तुमचे बाप आहे सर्वे तुमचं तुमचं काय आहे?, असं संजय राऊत म्हणालेत.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.