AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटील ‘मातोश्री’वर आले होते ‘या’ विषयांवर चर्चा झाली; संजय राऊत यांनी ‘त्या’ बैठकीतील सिक्रेट सांगितलं

Sanjay Raut on Jayant Patil and Uddhav Thackeray Meeting at Matoshree : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 'त्या' बैठकीतील सिक्रेट सांगितलंय. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर आले होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

जयंत पाटील 'मातोश्री'वर आले होते 'या' विषयांवर चर्चा झाली; संजय राऊत यांनी 'त्या' बैठकीतील सिक्रेट सांगितलं
| Updated on: Dec 30, 2023 | 11:54 AM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी मुंबई | 30 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेवर मातोश्रीवर झालेल्या बैठकीवर भाष्य केलं. वृत्त वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भात मी अधिक स्पष्ट करतो. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्या विषयीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. आमच्यात मतभेद आहेत. आमच्यामध्ये जागा वाटपावरून दुसफुस आहे, अशी चर्चा केली जात आहे. पण असं अजिबात नाही. तीनही पक्षात जागा वाटपासंदर्भात समन्वय आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

‘त्या’ बैठकीवर राऊत म्हणाले…

काल राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर आले होते. मीही तिथे उपस्थित होतो. उद्धवजी उपस्थित होते. सुभाष देसाई उपस्थित होते. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली. राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढू शकते त्यांची बलस्थान कुठे आहेत यावर चर्चा झाली चर्चा उत्तम झाली. त्यातून एक दिशा स्पष्ट झाली की, राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढायला इच्छुक आहेत. आता काँग्रेस सोबत देखील चर्चा होईल. आम्हाला आमची ताकद माहिती आहे, असं राऊतांनी सांगितलं.

काल जयंतराव पाटील आमच्यासोबत होते. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. जे भाजपसोबत गेले आहेत. त्यांना स्वतःचं अस्तित्व नाही. त्यांना स्वत:चं अस्तिस्व नष्ट करून राजकीय अस्तित्वासाठी त्यांना भाजपात विलीन व्हावे लागेल हे सत्य आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?

अफवांवर जाऊ नका 48 जागा महाराष्ट्रात आहेत. त्या जागांचं वाटप मेरिटनुसार होईल. आमचे सूत्र पहिल्यापासून एकच आहे. जिंकेल त्याची जागा… शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून राहिली आहे. 23 जागांवर लढायचं चर्चा सुरू आहे. एखाद्या जागेसंदर्भात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा दावा मजबूत असेल. तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीसोबत आमची चर्चा सुरू आहे, असं राऊतांनी सांगितलं आहे.

वंचितबाबतची भूमिका काय?

आमची चर्चा काँग्रेस संदर्भात दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांसोबत सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी कुठलीही भूमिका नाही की वंचित आपल्या सोबत येऊ नये. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे देखील तेच म्हणणं आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.