AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ बड्या नेत्याचं तिकीट कापून महाराष्ट्रातून लढावं, असं मोदींच्या डोक्यात; संजय राऊतांचा मोठं विधान

Sanjay Raut on Nitin Gadkari PM Narendra Modi and BJP : नागपूर अन् लोकसभा निवडणूक...; संजय राऊत यांचं स्पष्ट भाष्य, म्हणाले, नितीन गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं, असं मोदींच्या डोक्यात... ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद... नेमकं काय म्हणाले? वाचा...

'त्या' बड्या नेत्याचं तिकीट कापून महाराष्ट्रातून लढावं, असं मोदींच्या डोक्यात; संजय राऊतांचा मोठं विधान
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 10, 2024 | 12:44 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 10 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं नाव घेत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आधी तुमची जागावाटप नीट करा. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात भाजप पक्ष आणि त्यांचे दोन डंपर त्यांच्या हातून निसटतोय. यामुळे महाराष्ट्रातून जाऊन लोकांनी मोदींना विनंती केली आहे की, तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढा आणि मोदी ती ऑफर स्वीकारत आहेत. मोदी महाराष्ट्रातून लढले तर यांना चार-पाच जागा मिळतील. नितीन गडकरींचं तिकीट कापून नागपूरातुन लढावं असं मोदींच्या डोक्यात आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

आधी कट्यार कमरेला बाळगायला शिका. चाकू सूरेवाले आम्ही लोक आहोत. ही शिवसेना चाकू सूऱ्यातून वाढलेली आहे म्हणून आम्हाला शिकवू नका कट्यारची नाटकी… जर आमची कट्यार घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे आणि कोणत्या भोकात घुसते ती… आम्ही सर्व मिळून 40 च्या वर जागा जिंकणार आहोत आणि ते जर रोखायचं असेल तर मोदींनी महाराष्ट्रातून नागपूर किंवा पुण्यातून निवडणूक लढावी ही त्यांची भीती आहे,असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

फडणवीसांवर निशाणा

कोणाचा डंपर पलटी होतोय आणि कोणाचा @x#वर जातोय हे कळेल आता.. तुकारामांच्या अभंग गाथा या लोकांनी वाचाव्यात. डुक्कर कितीही चिखलात लोळलं आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता काय़ तर तो म्हणेल चिखलच माझं स्वर्ग आहे ही डुकराची नीती भाजप पक्षाची आहे. हे चिखलात लोळत आहेत. आमच्याबरोबर असताना हे स्वर्गात होते. स्वर्ग सुखात आनंद घेत होते. आज त्यांच्या बाजूला दोन डबकी आहेत त्या डबक्यात हे डुकर लोळत आहेत. फडणवीस यांची सध्याची जी काय वचवच सुरू आहे, हे त्यांचं नैराश्य आहे. निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

राऊतांचं टीकास्त्र

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ज्याप्रकारे तुफान निर्माण केलंय त्या तुफानाची यांना भीती वाटतेय. उद्धव ठाकरे आणि आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न या फडणवीसछाप सरकारने केला पण काही फायदा झाला नाही. ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये हे बसले आहेत. जो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे या कचऱ्याच्या डंपर मध्ये बसून भाजप पक्षाचा प्रवास जर सुरू असेल. तर महाराष्ट्र हा डंपिंग ग्राउंड नाही तर सगळा कचरा या डंपरसह महाराष्ट्राच्या सीमापार गुजरात मध्ये जाऊन आम्ही टाकणार आहोत. हे मी फडणवीस यांना सांगू इच्छितो, असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल