चाय पे चर्चा करा, कॉफीवर-ढोकळ्यावर करा पण ‘या’ मुद्द्यावर चर्चा करा; ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना का आवाहन

Uddhav Thackeray on Ram Mandir Inauguration and PM Narendra Modi : चाय पे चर्चा कार्यक्रमावरून उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला. चहावर चर्चा करा, कॉफीवर, ढोकळ्यावर करा पण 'या' मुद्द्यावर चर्चा करा, असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना ठाकरे काय म्हणाले? वाचा..

चाय पे चर्चा करा, कॉफीवर-ढोकळ्यावर करा पण 'या' मुद्द्यावर चर्चा करा; ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना का आवाहन
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 10:47 AM

मुंबई | 13 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर संवाद साधला. राम मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या उद्धाटनावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत असतात. याच कार्यक्रमावरून उद्धव ठाकरे यांनी मोदींना टोला लगावला आहे. तसंच चर्चेचं आवाहन केलं आहे.

राम मंदिराचं उद्धाटन होणार आहे. याचा सगळ्यांनाच आनंद आहे. या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलंय. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा. पण त्यानंतर देशाचं जे दिवाळं निघणार आहे. त्यावरही चर्चा करा. चाय पे चर्चा करा किंवा कॉफी पे चर्चा करा. बिस्कीट ढोकळा कशावरही चर्चा करा पण या मुद्द्यावर चर्चा करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे.

राष्ट्रपतींना आमंत्रण

येत्या 22 जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. 23 जानेवारी शिबिर आणि त्यानंतर जाहिर सभा होईल कार्यक्रम अगोदर जाहीर केला. 22 तारखेला प्रभू रामचंद्र सितामाई हनुमान तिथं असतील. आताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल सोमनाथचं मंदिर होतं. आम्ही काळाराम मंदिरात जात आहोत त्यासाठी आम्ही राष्ट्रपती यांना आमंत्रित करत आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी कडवट हिंदू…”

आम्ही राष्ट्रपती महोदयांना आम्ही आमंत्रण देत आहोत तसेच आमचे खासदार जाऊन देखील त्यांना आमंत्रण देतील. सोमनाथ मंदिराची प्राण प्रतीष्ठा ही राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते केलं होतं. राम मंदिराचं हे शंकराचार्य यांना आमंत्रण आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जर तिकडे आमंत्रण असेल तर त्यांच्या हस्ते पूजा व्हावी. कोणी राजकीय नेत्यांचे हस्ते होऊ नये. मी कडवट हिंदू आहे राममंदिर व्हावं ही आमची देखील इच्छा होती. आता ते मंदिर होतंय. त्याचं उद्धघाटन राष्ट्पतींच्या हस्ते व्हावं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....