निकालातच मुंबई विद्यापीठ नापास; अभियांत्रिकीच्या निकालात तांत्रिक चुका; सुधारीत यादीसाठी राष्ट्रवादीची मागणी

मुंबई विद्यापीठाकडून आजपर्यंत 21 हजार 167 पैकी 17 हजार 536 विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.  तर राहिलेले इतर निकाल लवकरच जाहीर केले जातील असे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

निकालातच मुंबई विद्यापीठ नापास; अभियांत्रिकीच्या निकालात तांत्रिक चुका; सुधारीत यादीसाठी राष्ट्रवादीची मागणी
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 11:49 AM

मुंबईः मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) कोणत्याही परीक्षेचा निकाल असला तरी तो नेहमीच चर्चेत राहणारा असतो. कधी निकालातील दिरंगाई तर कधी निकालातील चुका. विद्यापीठाच्या परीक्षेतील हा नेहमीचाच गोंधळ पाहायला मिळत असतो. यावेळीही असाच प्रकार आता उघड झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षेचा निकाल (Engineering Degree Exam Result) नुकताच जाहीर झाला मात्र या निकालात खूप मोठ्या प्रमाणात तांत्रिक चुका (technical errors) राहिल्या आहेत. त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या चुका तातडीने दुरुस्त करून विद्यार्थ्यांची सुधारित यादी जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

निकाल 79 दिवसानंतर…

अभियांत्रिकी पदवी परीक्षा  17 ते 30 मे या कालावधीत पार पडल्या होत्या, त्या परीक्षांचा निकाल विद्यापीठाने नुकताच जाहीर केला आहे मात्र हा निकाल 45 दिवसात जाहीर होणे अपेक्षित असतानाही त्याला आता 79 दिवसांचा कालावधी लावण्यात आला आहे आणि निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात खूप तांत्रिक त्रुटी ठेवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्नेसने केला आहे.

 परदेशी शिक्षणात अडथळे

परीक्षांचा निकाल 70 दिवस उलटूनही न लागल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाल्या असून अनेकांचे परदेशी शिक्षणाची संधी यामुळे हुकत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

या निमित्ताने पुन्हा एकदा ऑफलाईन परीक्षांचे निकाल लावण्यात मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग नापास झाल्याचे ठिकाण विद्यार्थी संघटना कडून केली जात आहे 70 दिवस उलटल्यावर हे विद्यार्थ्यांचे निकाल हाती न आल्याने परीक्षा व मूल्यमापन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आल्याचे टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल मातेले यांनी केले आहे.

मुबंई विद्यापीठातील 17533 विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटील यांनी आतापर्यंत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखे अंतर्गत अंतिम सत्राचे शाखा निहाय सात निकाल जाहीर झाल्याची माहिती दिली असून त्यामध्ये तांत्रिक चुका राहिल्या असल्याने त्याचा फटका आणि त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.

 एवढ्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाकडून आजपर्यंत 21 हजार 167 पैकी 17 हजार 536 विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.  तर राहिलेले इतर निकाल लवकरच जाहीर केले जातील असे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रथमच परीक्षा ऑफलाईन

तांत्रिक कारणास्तव कोणतेही निकाल राखले नसून कोरोना नंतर प्रथमच ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली आहे. तसेच मूल्यमापन ही ऑन स्क्रीन मार्किंगद्वारे झाले असल्याचेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने गोपनीय निकाल दिले जात असल्याची माहितीही पाटील यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.