लोकलमध्ये महिलेला जुळे, एका बाळाचा जन्म सफाळेत, दुसऱ्याचा पालघरमध्ये

पालघर: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेत दररोज काही ना काही घडत असतं. लोकलमध्ये महिलांच्या प्रसुतीच्या बातम्या तर ठराविक दिवसांनी येतच असतात. आजही एका महिलेची लोकल ट्रेनमध्येच प्रसुती झाली. या महिलेने चक्क जुळ्यांना जन्म दिला. महत्त्वाचं म्हणजे एका बाळाचा जन्म धावत्या लोकलमध्ये सफाळे स्टेशनजवळ तर दुसऱ्या बाळाचा जन्म पालघर रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालयात झाला. संबंधित महिला प्रसुतीसाठी […]

लोकलमध्ये महिलेला जुळे, एका बाळाचा जन्म सफाळेत, दुसऱ्याचा पालघरमध्ये
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

पालघर: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेत दररोज काही ना काही घडत असतं. लोकलमध्ये महिलांच्या प्रसुतीच्या बातम्या तर ठराविक दिवसांनी येतच असतात. आजही एका महिलेची लोकल ट्रेनमध्येच प्रसुती झाली. या महिलेने चक्क जुळ्यांना जन्म दिला. महत्त्वाचं म्हणजे एका बाळाचा जन्म धावत्या लोकलमध्ये सफाळे स्टेशनजवळ तर दुसऱ्या बाळाचा जन्म पालघर रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालयात झाला.

संबंधित महिला प्रसुतीसाठी विरार-डहाणू लोकलने सफाळेवरुन पालघरकडे जात होती. त्यादरम्यान धावत्या लोकलमध्येच तिला प्रसववेदना सुरु झाल्या. लोकलमध्येच तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर लोकल सुटल्याने तिला पालघर रेल्वे स्थानकापर्यंत तसंच प्रवास करावा लागला. पालघर रेल्वे स्थानकात बाळ आणि बाळंतीण महिलेला रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये हलवण्यात आलं. तिथे या महिलेने आणखी एका बाळाला जन्म दिला. आधी मुलीला नंतर मुलाला अशा जुळ्या बाळांना या महिलेने जन्म दिला.

त्यादरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर पालघर रेल्वे स्थानकात तातडीने हजर झाले. त्यांनी बाळ -बाळंतीणीला रुग्णालयात हलवलं. सध्या पालघर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बाळ आणि बाळंतीण सर्वजण सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.