Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे.

Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?
समीर वानखेडे यांची चौकशी
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 8:51 AM

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे. समीर वानखेडे यांनी एनसीबीमध्ये कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ मागितली नसल्याचं समोर आलं आहे. एनसीबीनं याविषयीची माहिती दिल्याचं ट्विट एनएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे.

समीर वानखेडेंची एनसीबीतील कामगिरी

समीर वानखेडे डेप्युटेशनवर सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीच्या मुंबई कार्यालयात रुजू झाले होते.ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत समीर वानखेडे यांनी 96 जणांना अटक करत 28 केसेस दाखल केल्या. तर 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक करत 117 केसेस दाखल केल्या आहेत. वानखेडे यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी रुपयांचं 1791 किलो ड्रग्ज जप्त केलं तर काही संपत्ती देखील जप्त केली.

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन वर कारवाई

समीर वानखेडेंनी एनसीबीमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा रिया चक्रवर्तीला अटक केली होती. समीर वानखे़डे यांच्याकडून त्यानंतर दीपिका पादूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंग यांना सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनवरुन चौकशीला बोलावण्यात आलं होतं.

आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात

समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरण हा फर्जीवाडा आणि खंडणीचं प्रकरण असल्याचा आरोप समीर वानखेडेंवर केला होता. आर्यन खान प्रकरणातील साक्षीदारांवरुन देखील वाद निर्माण झाला होता.

वानखेडेंनी मुदतवाढ न मागितल्यानं एनसीबीतील कार्यकाळ संपणार समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस ऑफिसर आहेत. ते सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीमध्ये डेप्युटेशनवर रुजू झाले होते. त्यापूर्वी ते डीआरआयमध्ये कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादांच्यापार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्याकडून मुदतवाढ मागण्यात आली नसल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

Mumbai Zonal Director Sameer Wankhedes tenure to end on 31Dec

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.