मुंबईकरांचा प्रवास आता आणखी गारेगार होणार, बेस्टच्या ताफ्यात 6 मिनी AC बस दाखल

ट्राफिकपासून मुक्तता करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 6 एसी मिनी बस (BEST Mini AC bus) दाखल होणार आहेत.

मुंबईकरांचा प्रवास आता आणखी गारेगार होणार, बेस्टच्या ताफ्यात 6 मिनी AC बस दाखल

मुंबई : ट्राफिकपासून मुक्तता करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 6 मिनी AC बस (BEST Mini AC bus) दाखल होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज सकाळी कुलाब्यातील बेस्ट मुख्यालयात (Best Bhavan) या बसेसचा लोकापर्ण (BEST Mini AC bus) सोहळा पार पडणार आहे. यानंतर काही दिवसांनंतर मुंबईतील रस्त्यांवर मिनी एसी बस धावताना दिसणार आहेत.

बेस्ट बस ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन (Mumbai BEST Bus) समजली जाते. काही दिवसांपूर्वी बेस्ट प्रशासनाने बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रॉनिक बसचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता या सहा मिनी एसी बस (BEST Mini AC bus) मुंबईतील रस्त्यांवर धावणार आहेत. या बसमध्ये 21 प्रवाशी बसू शकतात. या बस प्रामुख्याने रेल्वे आणि मेट्रो स्टेशन परिसरात धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे.

दरम्यान या बसचा मार्ग नेमका काय असणार याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुरुवातीला या बस कुलाबा बस डेपोशी जोडलेल्या असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ऑफिसची संख्या जास्त आहेत, त्या ठिकाणी या बस चालवल्या (BEST Mini AC bus) जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये एकही वाहक (कंडक्टर) असणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकांच्या साधन सुविधांसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावे यांनी काही दिवसांपूर्वी MSRTC च्या बसचे लाईव्ह ट्रँकिग सिस्टीम सुरु केलं होते. यामुळे प्रवाशांना बस किती वेळात पोहोचणार असल्याचे समजू शकेल.

विशेष म्हणजे येत्या काही महिन्यांत बेस्टचा बसताफा 3500 हून 6 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यातील काही बस टप्प्याटप्प्यांनी बेस्टच्या ताफ्यात दाखल होत आहेत. बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांसाठी नवीन सुविधा देताना बेस्ट एसी बस, मिनी, मिडी बसचा समावेश केला आहे.


Published On - 1:05 pm, Mon, 16 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI