Dr Mahinder Watsa | लैंगिक शंका-कुशंकांना हलकीफुलकी उत्तरं, सेक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचे निधन

डॉ. महिंदर वत्स यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील लैंगिक विषयाशी निगडीत शंका-कुशंका दूर केल्या

Dr Mahinder Watsa | लैंगिक शंका-कुशंकांना हलकीफुलकी उत्तरं, सेक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचे निधन
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 12:51 PM

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लैंगिक समुपदेशक म्हणजेच सेक्स्पर्ट डॉ. महिंदर वत्स (Dr Mahinder Watsa) यांचे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 96 वर्षांचे होते. डॉ. महिंदर वत्स यांनी ‘मुंबई मिरर’ दैनिकातील ‘आस्क द सेक्स्पर्ट’ या स्तंभातून अनेक वाचकांच्या लैंगिक समस्यांचं निराकरण केलं होतं. भारतासारख्या बलाढ्य देशात लैंगिक शिक्षणाच्या कमतरतेविषयी त्यांनी अनेकदा खंत व्यक्त केली होती. (Mumbai’s Famous Sexpert Dr Mahinder Watsa Dies at 96 in Mumbai)

डॉ. महिंदर वत्स यांनी स्तंभलेखनातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील लैंगिक विषयाशी निगडीत लहान मोठ्या शंका-कुशंका दूर केल्या. ज्या विषयावर उघडपणे बोलण्यास फारसं कोणी धजावत नाही, तो विषय डॉ. वत्स यांनी आपल्या सदरातून हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला. लैंगिक शिक्षणासोबतच वाचकांच्या तिरकस प्रश्नांनाही डॉक्टर विनोदी पद्धतीने उत्तरं देत असत. जडजंबाळ वाटणारा विषय सोपा करुन सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.

मुलांकडून आठवणींना उजाळा

“बाबांचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होतं. ते आपल्या पद्धतीने उत्तम जीवन जगले. आज ते आपल्या लाडक्या प्रोमिलाच्या भेटीसाठी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या आयुष्याचं सेलिब्रेशन करायला आवडेल” अशा भावना त्यांच्या मुलांनी व्यक्त केल्या.

“सल्लागार, मार्गदर्शक, गुरु, समुपदेशक अशा अनेक भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठवल्या. त्यांनी आयुष्यात अनेक अडथळे पार करत यश मिळवलं. त्यांची नेहमीच आठवण येईल” अशा शब्दात त्यांची मुलं, सूना आणि नातवंडांनी स्मरणरंजन केलं.

डॉ. महिंदर वत्स यांनी 60 च्या दशकात वयाच्या तिशीत स्तंभलेखक म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. महिलांच्या मासिकासाठी त्यांना वैद्यकीय सल्ला देणारा स्तंभ लिहिण्यास त्यांना सांगितले गेले. 1970 च्या दशकात त्यांनी महिलांविषय अनेक मासिकांसाठी आरोग्य स्तंभांचे लेखन चालू ठेवले. लैंगिक आरोग्याबद्दलच्या प्रश्नांना कात्री लावण्याचा आग्रह एका संपादकाने धरल्यानंतर डॉक्टरांचे लेखन थांबले.

1974 मध्ये भारतीय कौटुंबिक नियोजन असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीएआय) चे सल्लागार म्हणून काम करताना डॉ. वत्स यांनी लैंगिक समुपदेशन आणि शैक्षणिक कार्यक्रम सुरु करावा, अशी भूमिका मांडली. विरोध असूनही, एफपीएआयने त्यांचा सल्ला स्वीकारला आणि भारतातील पहिले लैंगिक शिक्षण, समुपदेशन आणि थेरपी सेंटर सुरु केले. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला डॉ वत्स यांनी समुपदेशनात पूर्णवेळ काम करण्यासाठी वैद्यकीय प्रॅक्टिस सोडली. (Mumbai’s Famous Sexpert Dr Mahinder Watsa Dies at 96 in Mumbai)

डॉ. वत्स यांची गाजलेली प्रश्नोत्तरे

प्रश्न : माझै विवाहित मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध आले, त्यातून ती गर्भवती राहिली. तिच्या नवऱ्याला याविषयी समजेल का? बाळ माझ्यासारखे दिसेल का?

उत्तर : डीएनए चाचणीशिवाय तिच्या पतीला समजण्याची शक्यता नाही, मात्र बाळ तुमच्यासारखे दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे गुपित अधिक काळ गुप्त राहणार नाही, टॉस उडवून बघा

प्रश्न : माझ्या गर्लफ्रेण्डचे इतरांसोबत लैंगिक संबंध असल्याची मला शंका आहे. ती वारंवार हे आरोप नाकारते. मी काय करु?

उत्तर : विश्वास हे कुठल्याही नात्याचे गमक असते, तुमचा तिच्यावर विश्वास नसल्याने तिने तुम्हाला लाथ घालून हाकलले पाहिजे

(Mumbai’s Famous Sexpert Dr Mahinder Watsa Dies at 96 in Mumbai)

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....