तर देशात पहिली भुयारी रेल्वे मुंबईत धावली असती ! काय होती महत्वाकांक्षी योजना
देशाच्या आर्थिक राजधानीत भुयारी रेल्वे मार्गाचे काम अजूनही सुरु आहे. कुलाबा-बीकेसी-सिप्झ या 33.5 किमी भुयारी रेल्वेचे काम कोरोना काळ आणि आरे कारशेडच्या वादामुळे प्रचंड रखडले आहे. देशात 1984 मध्ये कोलकाता शहरात पहीली भुयारी मेट्रो धावली होती. परंतू त्याच्या आधीच मुंबईत साठच्या दशकात भुयारी रेल्वे चालविण्याची योजना आखण्यात आली होती. या योजनेला मूर्तस्वरुप का आले नाही ? काय अडचणी आल्या ते पाहूयात

मुंबईच्या पोटातून जाणाऱ्या कुलाबा – बीकेसी – सिप्झ मेट्रो या 33.5 किमी भुयारी मेट्रोचे काम अजून सुरु आहे. मुंबईच्या अंडरग्राऊंड मेट्रोचा पहिला बीकेसी ते आरे असा टप्पा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. परंतू तुम्हाला हे माहीती आहे का ? मुंबईत साठच्या दशकात अंडरग्राऊंड लोकल चालविण्याची योजना होती. या योजनेचे काम एका मराठी माणसाच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते. ही योजना जर राबविली गेली असती तर कोलकाताच्याआधी मुंबईत साठच्या दशकातच अंडरग्राऊंड ट्रेन धावली असती. काय होती ही योजना ? ही योजना तडीस का गेली नाही ? चला पाहुयात… ‘रिंग रुट अंडरग्राऊंड’ रेल्वे मार्ग मुंबईकरांना अविरत सेवा देणाऱ्या...
