रोजगार देणाऱ्या ‘वस्त्रोद्योगा’ला बळ देणार, अजित पवारांकडून ‘या’ 3 महत्त्वाच्या निर्णायांचे संकेत

"वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांपैकी एक उद्योग आहे. त्याच्याशी संबंधित प्रश्नांवर राज्य सरकार सकारात्मक आहे," अशी माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (16 मार्च) दिली.

रोजगार देणाऱ्या ‘वस्त्रोद्योगा’ला बळ देणार, अजित पवारांकडून 'या' 3 महत्त्वाच्या निर्णायांचे संकेत
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 9:07 PM

मुंबई : “वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांपैकी एक उद्योग आहे. या उद्योगात हजारो कुटुबांचा चरितार्थ चालवण्याची क्षमता आहे. वस्त्रोद्योगाची ही क्षमता लक्षात घेऊन या क्षेत्राचे प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडवण्यात येतील. 27 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या यंत्रमागांना वीजवापरावर 75 पैसे प्रति युनिट अतिरिक्त अनुदान देणे, रेशीम संचालनालयातील रिक्तपदे कंत्राटी पध्दतीने भरण्यास मान्यता देण्यासह, वस्त्रोद्योगासाठी सौरऊर्जेच्या वापराची शक्यता तपासणे इत्यादी विषयांवर राज्य सरकार सकारात्मक आहे,” अशी माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (16 मार्च) दिली. ते राज्यातील वस्त्रोद्योगाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होते (MVA Government thinking positively on cloth industry issue say Ajit Pawar in Mumbai).

अजित पवार म्हणाले, “वस्त्रोद्योगाला बळ देण्यासाठी 27 एचपीपेक्षा अधिकच्या क्षमतेच्या यंत्रमागधारकांना प्रतियुनिट 75 पैसे अतिरिक्त अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. रेशीम उद्योगासाठी महत्वाचा असलेल्या रेशीम संचालनालयातील कामाची व्याप्ती आणि रिक्तपदांचा विचार करण्यात येईल. त्यानुसार खास बाब म्हणून रिक्त पदं कंत्राटी पध्दतीने भरण्याला परवानगी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.”

“वस्त्रोद्योगाशी संबंधित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योग व्यवसायावर असलेले संकट थांबवण्यासाठी सूत दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाशी पत्रव्यवहार करावा,” अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

कोणते 3 महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता?

1. 27 एचपीपेक्षा अधिकच्या क्षमतेच्या यंत्रमागधारकांना प्रतियुनिट 75 पैसे अतिरिक्त अनुदान

2. रेशीम संचालनालयातील रिक्तपदं कंत्राटी पध्दतीने भरणार

3. वस्त्रोद्योग व्यवसायावर असलेले संकट थांबवण्यासाठी सूत दरवाढीवर नियंत्रण

या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार धैर्यशील माने (व्हीसीद्वारे), आमदार प्रकाश आवाडे, अनिल बाबर, संजय शिंदे, आसिफ शेख रशीद आदींसह सहकारी वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रातील मान्यवर तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Jayant Patil | पिचड समर्थकाची राष्ट्रवादीत घरवापसी, जयंत पाटील म्हणतात…

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोनाचा पॉझिटिव्ह, शुक्रवारी अजितदादांच्या बैठकीला उपस्थित!

पिचड समर्थकाची राष्ट्रवादीत घरवापसी, आमचं सरकार नसतं, तर आला असता का माहित नाही, जयंत पाटलांचा टोला

व्हिडीओ पाहा :

MVA Government thinking positively on cloth industry issue say Ajit Pawar in Mumbai

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.