AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिचड समर्थकाची राष्ट्रवादीत घरवापसी, आमचं सरकार नसतं, तर आला असता का माहित नाही, जयंत पाटलांचा टोला

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार, असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता (Sitaram Gaikar NCP Jayant Patil )

पिचड समर्थकाची राष्ट्रवादीत घरवापसी, आमचं सरकार नसतं, तर आला असता का माहित नाही, जयंत पाटलांचा टोला
सीताराम गायकर यांची राष्ट्रवादीत घरवापसी
| Updated on: Mar 16, 2021 | 3:59 PM
Share

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर (Sitraam Gaikar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही, असे शालजोडीत लगावून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गायकरांचे स्वागत केले. गायकर हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकचे माजी चेअरमन आहेत. (Madhukar Pichad supporter Sitaram Gaikar returns NCP Jayant Patil taunts)

“आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असतात की नाही, हे माहिती नाही. मी याच ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी कोणी थांबायला तयार नव्हतं. मधुकर पिचड यांनी पक्ष का सोडला, हे अजूनही मला कळत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा अनेक पक्षातील नेत्यांना आदर आहे. अनेक जणांना आपल्या पक्षात यायचं आहे. राष्ट्रवादी हा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे” असं जयंत पाटील म्हणाले.

गायकरांचं धोतर फेडण्याची अजित पवारांची भाषा

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार, असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या सीताराम गायकर यांचं धोतर फेडण्याची भाषा केली होती. त्यानंतर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. किरण लहामटे यांनी गायकर यांचा पराभवही केला होता.

अजित पवारांच्या पाठिंब्याने गायकर जिल्हा बँकेवर

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पाठिंब्याने अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सीताराम गायकर हे बिनविरोध निवडून आले होते. तेव्हापासूनच सीताराम गायकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार, अशी चर्चा रंगली होती. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. सीताराम गायकर यांच्यासह अगस्ती ग्रामीण पतसंस्थेच्या 9 सदस्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सीताराम गायकर यांच्या मदतीने अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत मधुकर पिचड यांना धक्का देण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे. लवकरच या कारखान्याची निवडणूक होणार आहे. (Madhukar Pichad supporter Sitaram Gaikar returns NCP Jayant Patil taunts)

कोण आहेत सीताराम गायकर?

* सीताराम गायकर हे मूळचे ऊस तोड कामगार * मेगरस येथे दूध संकलन केंद्राची सुरूवात * अमृत सागर दूध संघाचे संचालक * 1995 मध्ये मधुकर पिचड यांच्याविरोधात बंड करत तिसऱ्या आघाडी स्थापन केली. मात्र, तिसरी आघाडी सपशेल फोल ठरली. * अशोक भांगरेंचा मधुकर पिचडांनी 35 हजाराच्या फरकाने त्यावेळी पराभव केला होता. निवडणुकानंतर काही दिवस पुन्हा पिचडांसोबत आले. अगस्ती ग्रामीण दूध संघाचे संचालक झाले. नंतर दूध संघाच्या चेअरमनपदी वर्णी लागली. * 1988 साली अगस्ती सागर कारखान्याची स्थापना झाली. त्यात ‌सीताराम गायकर संचालक झाले. * अकोले तालुका एज्युकेशन विश्वस्त संचालक * अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष * मधुकर पिचड यांच्या आशीर्वादाने अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद. अध्यक्षपदाची कारकीर्द वादग्रस्त राहिली. कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप. * मधुकर पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश

संबंधित बातम्या   

पिचडांनी पाप केलंय, गाठ माझ्याशी आहे, सीताराम गायकरांचं धोतर फेडू : अजित पवार

अजित पवारांनी धोतर फेडण्याची भाषा केलेल्या ‘त्या’ नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी

मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!  

(Madhukar Pichad supporter Sitaram Gaikar returns NCP Jayant Patil taunts)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.